बॉलिवूडमधील महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. कामात कितीही व्यस्त असेल तरीही ते न चुकता त्याच्या चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत असतात. एखाद्या तरुण कलाकाराला लाजवेल असा ८० व्या वर्षात देखील त्यांचा उत्साह आहे. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) सर्वत्र दसरा हा सण साजरा होत आहे. या निमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियावर मराठमोळ्या पद्धतीने चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर विठ्ठल रुक्मिणी यांचा एक फोटो शेअर करून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते मुंबईमधील एका मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी हा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Bollywood actor amitabh bachchan share a vitthal Rukmini photo on social media and give best wishes for dashera)
हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “श्री विठ्ठल मंदिर शिव मुंबई. आश्विन शुद्ध दशमी, विजया दशमी, शुभदिव स, दसरा, विजय मुहूर्त दुपारी २: २१ ते ३: ०७, अश्व पूजा, सिमोल्लंघन, श्री साई बाबा पुण्यतिथी उत्सव (शिर्डी) शुक्रवार १५ ऑक्टोबर २०२१” यासोबत त्यांनी लिहिले आहे की, “नमस्कार तुम्हा सर्वांना दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा.” त्यांनी दिलेल्या या शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. काही तासांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांच्याकडून व्याकरणाच्या काही चुका झाल्या होत्या. त्यांच्या एका चाहत्याने त्यांची ही चूक लक्षात आणून दिली होती. तसेच यावत अमिताभ बच्चन यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर
–आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स