मेगास्टार अमिताभ बच्चन यांना ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली हाेती. अशात अभिनेत्याने त्यांचे हेल्थ अपडेट जारी केले आहे. लवकर बरे हाेण्यासाठी बिग बींनी त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहे आणि यासाेबतच रॅम्पवर पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली.
अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एका शोच्या रॅम्पवर चालतानाचा फोटो पोस्ट केला आहे. यासाेबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “मी बरे होण्यासाठी केलेल्या सर्व प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.. माझ्या तब्येतीत सुधारणा हाेत आहे.. लवकरच रॅम्पवर परत येण्याची आशा आहे.”
हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला दुखापत झाली होती. अभिनेत्याने त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे आरोग्य अपडेट शेअर केले. अभिनेत्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला, ज्यानंतर ते हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करून मुंबईला रवाना झाले, जिथे ते त्यांच्या घरी विश्रांती घेत आहेत. या चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स दरम्यान त्याच्या उजव्या बरगडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती.
View this post on Instagram
त्यांनी लिहिले की, ‘या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. हा प्रकल्प अश्विनी दत्त यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला एका साइंस फिक्शन फिल्म आहे. तेलुगू आणि हिंदीमध्ये एकाच वेळी शूट होत असलेल्या या शोमध्ये अमिताभ, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी हे कलाकार आहेत.
अमिताभ बच्चन यांनी 50 वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांची जादू कायम आहे. वयाच्या या टप्प्यावरही अमिताभ बच्चन यांचा उत्साह तरुणाईपेक्षा कमी नाही. या वयातही अमिताभ बच्चन पडद्यावर अॅक्शन करताना दिसतात, जे पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्साही असतात. (bollywood actor amitabh bachchan posted his health update says recovering fast and planning to return on set)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी’ म्हणत अभिनेत्री शिवाली परबने केली ‘फुलराणी’साठी खास पोस्ट
स्वराने रिसेप्शनमध्ये परिधान केला पाकिस्तानी लेहेंगा; फोटो शेअर करत म्हणाली…