Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी बिग बींनी दिली नवी कल्पना, व्हिडिओ पाहून चाहेत थक्क

बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते कायमच काेणता ना काेणता फाेटाे किंवा व्हिडिओ शेअर करून चर्चेत राहतात. अशात आता अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे काही शेअर केले आहे की, व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू काही आवरता येत नाही. अमिताभ बच्चन यांनी एका पोलिसाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती काहीतरी विचित्र करताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक पोलिस कर्मचारी हातात पांढरी पिशवी घेऊन चालत आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे तो पंख्यासारखा शेंडी फिरवत रस्त्यावरून चालत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कडक उन्हाळा आहे आणि ताे व्यक्ती खूप वेगाने चालत आहे. अमिताभ बच्चन यांनी या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘दिवसभराच्या उन्हात ते थंड होण्यासाठी स्वत:चा पंखा घेऊन जात आहेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर ते भन्नाट प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘अमिताभ बच्चन सर, उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी हा देवाने दिलेला जुगाड आहे. प्रत्येकाकडे हे कौशल्य आहे, ते कौशल्य जागृत करणे ही काळाची गरज आहे, यावर तुमचा विश्वास आहे की नाही?’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘अलादीन का जिन है वो कुछ भी कर सकता है.’ याशिवाय एका व्यक्तीने मजेशीरपणे लिहिले की, ‘ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे.’ अशाप्रकारे चाहते अभिनेत्याच्या पाेस्टवर विविध कमेंट करत आहेत.(bollywood actor amitabh bachchan shares funny video on instagram fans reacting and commenting )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मायलेकीच्या जाेडीला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी केले ट्राेल, म्हणाले, ‘दुसरी हेअरस्टाइल पाहायला…’

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये साराने केला डेब्यू, रेड कार्पेटवर ब्राइडल लूकमध्ये दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा