सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जवळपास 40 वर्षे त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. निधनाच्या 2 दिवस आधी, ते त्यांच्या मित्रांसोबत होळी खेळत होते. 7 मार्च रोजी त्याने ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ते मनोरंजन विश्वातील कलाकारांसोबत दिसले होते.
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी सोशल मिडीयावर होळीनिमित्त एक पोस्ट केली होती. ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी होळीचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सतीश कौशिक जावेद अख्तर, महिमा चौधरी आणि इतर कलाकारांसोबत दिसत आहेत. हा फोटो होळीच्या पार्टीचा आहे, ज्यामध्ये सतीश कौशिकही खूप खुश दिसत आहेत. पण ही छायाचित्रे पाहता सतीश कौशिकसारखे कलाकार आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट केले आणि लोकांचे भरपूर मनोरंजन केले.
Colourful Happy Fun #Holi party at Janki Kutir Juhu by @Javedakhtarjadu @babaazmi @AzmiShabana @tanviazmi.. met the newly wed beautiful couple @alifazal9 @RichaChadha.. wishing Happy Holi to everyone ???????????????????????????? #friendship #festival #Holi2023 #colors pic.twitter.com/pa6MqUKdku
— satish kaushik (@satishkaushik2) March 7, 2023
अनुपम खेर यांनी व्यक्त केला शोक
अनुपम खेर यांनी लिहिले, “मला माहित आहे की ‘मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे!’ पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारख होणार नाही! ओम शांती!”
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! ???????????? pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
अनुपम खेर यांचा 7 मार्च रोजी वाढदिवस होता. त्यांच्या जिगरी मित्राला वाढदिवसानिमित्त सतीश यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्वीट करूत त्यांनी लिहिले की, ‘के साहब तुम्ही आता पाण्यात पोहणे शिकत असाल, पण तुम्ही आयुष्यात सुवर्णपदक विजेता जलतरणपटू झाला आहात. फ्रंट स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, डायव्हिंग, फ्लोटिंग या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीवनात स्वाभिमानाने, सामर्थ्याने, पोहत आहे आणि तरुण आणि तरुण होत चालले आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!’
KSaab u must be learning swimming in water now but u hv been a gold medalist swimmer in life .
With ur ace technique of front stroke,backstroke,diving ,floating has swam thru life with dignity,power ,elan & kept getting younger & younger. wishing u a Happy Birthday ???????? https://t.co/cQVB4mqlwJ— satish kaushik (@satishkaushik2) March 7, 2023
इमरजेंसी चित्रपटात दिसणार होते
सतीश कौशिक यांनी गुरुवारी, ९ मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता कंगना राणौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार होते. रिपोर्ट्सनुसार, सतीश यांच्या दिग्दर्शनाखाली आणखी काही चित्रपट बनवायचे होते जे फ्लोरवर आहेत. काही काळापूर्वी त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र असलेले अनुपम खेर यांना त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे. (bollywood-actor-and-director-satish-kaushik-death-last-post-and-tweet-viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण