Monday, July 1, 2024

‘आम्ही जणू एक वर्षांनी…’, अनुपम खेर यांनी अनिल कपूरसाेबतचा ‘ताे’ व्हिडिओ केला शेअर

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अभिनेते अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित स्टाेरी आणि विचार चाहत्यांमध्ये शेअर करतात. अलीकडेच, अनुपम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये व्हायरल होत असून, लोक या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अनुपमन खेर(anupam kher) यांनी झी सिने अवॉर्ड्समधील एक क्लिप शेअर केली, ज्यामध्ये ते अनिल कपूर (anil kapoor) याला मिठी मारताना आणि त्याच्याशी संवाद साधताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांनी काळ्या रंगाच्या फॉर्मल कोट परिधान केलाे आाहे, तर बॉलिवूडचा एव्हरग्रीन हिरो अनिल कपूर ब्लू कलरच्या सूटमध्ये डॅशिंग दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना अनुपम यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर आपण दोघे मुंबईत असू, तर मी आणि अनिल कपूर दिवसातून किमान दोनदा भेटतो, पण इथे आम्ही असे भेटताेय जणू वर्षभर भेटलोच नाही. कदाचित याला मैत्री म्हणतात.” त्यांनी पुढे लिहिले की, “आमचा मित्र सतीशला कदाचित हा व्हिडिओ अजिबात आवडणार नाही, पण आमची मैत्री कायम राहील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “व्वा तुमची मैत्री खूप चांगली आहे. खरच खूप छान.” तर दुसर्‍या युजरने लिहिले की, “या मैत्रीला काेणाचीही नजर लागू नये. वर्षानुवर्षांच्या मैत्रीला कोणत्याही टॅगची गरज नसते. दिवसेंदिवस ती अधिक मजबूत हाेते.”

अनुपम खेर यांच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ते विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्याची स्टाेरी कोरोना महामारीवर आधारित असेल. याशिवाय अभिनेता कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातही दिसणार आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (bollywood actor anupam kher shares a video greeting good friend anil kapoor and vivek agnihotri with hug and jokes)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मराठी भाषा दिनाच्या दिवशी आली अनिल कपूर यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाले…

राखी भडकली मुंबई पाेलिसांवर; म्हणाली, ‘सेलिब्रिटींना न्याय देऊ शकत नाही, सामान्य माणसाला…’

हे देखील वाचा