Wednesday, June 26, 2024

अनुपम खेर यांना करोडोंची कार सोडून ऑटोमध्ये करावा लागला प्रवास; म्हणाले, ‘काहीही होऊ शकते’

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या ‘शिव शास्त्री बाल्बोआ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अभिनेता एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे, ज्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे बदलले आहे.  दिल्लीत रविवारी (दि. 5 फेब्रुवारी)ला या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे अभिनेता ऑटोमध्ये आल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. अशातच आता अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या घटनेबद्दल सांगितले आहे.

तर झाले असे की, अभिनेता अनुपम खेर (anupam kher) यांच्या ‘शिव शास्त्री बाल्बोआ ‘ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग दिल्लीत आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान, अभिनेत्याला त्यांच्या ड्रायव्हरने चुकीच्या ठिकाणी सोडले परिणामी कार्यक्रमाला वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांना ऑटोरिक्षातून प्रवास करावा लागला. अभिनेत्याने त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते कॅनॉट प्लेस येथे ऑटोमधून खाली उतरताना दिसत आहे. यानंतर ते ऑटोचालकाशी भेटतात आणि सिनेमागृहाच्या दिशेने जाताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले की, ‘काही ही हाेऊ शकते, काल दिल्लीत माझ्या शिव शास्त्री बाल्बोआ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग होते. ड्रायव्हरने मला चुकीच्या थिएटरमध्ये सोडले, म्हणून मला माझ्या सूट आणि बूटमध्ये ऑटोमध्ये जावे लागले. जमिनीवर उतरताना खूप मजा आली. यासोबत त्यांनी लाइफ, कुछ भी हो सक्ता है आणि ह्युमर असे तीन हॅशटॅग वापरले आहे. चाहत्यांना अभिनेत्याचा हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

‘शिव शास्त्री बाल्बोआ ‘मध्ये अनुपम खेर यांच्याशिवाय नीना गुप्ता, जुगल हंसराज, नर्गिस फाखरी आणि शरीब हाश्मी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. अजयन वेणुगोपालन दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच चाहते अनुपम खेरच्या लूकचे प्रचंड कौतुक करत आहेत. हा चित्रपट 10 फेब्रुवारीला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित हाेणार आहे.(bollywood actor anupam kher takes an auto ride in delhi for film special screening in delhi )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…पण मी किती वेडी आहे हे तुम्हाला…’, कंगना रणौतने माफियांविरोधात व्यक्त केला रोष

‘मी अशा रंगाची…’, शिवाली परबची ‘ती’ पाेस्ट चर्चेत

हे देखील वाचा