बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना हा देखील त्याचा भाऊ आयुषमान खुरानाप्रमाणे आता बॉलिवूडमध्ये आपला जम बसवत आहे. अपारशक्ती अजूनही सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका निभावतो, असे असले तरीही सोशल मीडियावर त्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. ‘स्त्री’ या चित्रपटात त्याने साईड रोल निभावून प्रेक्षकांच्या मनात घर बनवले होते. अशातच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर केली आहे.
अपारशक्ती खुरानाने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याची पत्नी आकृती खुराना ही गरोदर असल्याची बातमी दिली आहे. आता त्याच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्याने एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. त्याने सोशल मीडियावर हा खुलासा केला आहे की, ते दोघे लवकरच आई- बाबा बनणार आहेत. त्याने एक सुंदर फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली आहे.
अपारशक्तीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो त्याच्या पत्नीच्या बेबी बंपवर किस करताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य दिसत आहे. या फोटोसोबत त्याने एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. जे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
त्याने लिहिले आहे की, “लॉकडाऊनमध्ये काम तर नाही होऊ शकले मग आम्ही कुटुंब बनवण्याचा विचार केला.” या सोबतच त्याने सांगितले की, लॉकडाऊनमध्ये त्यांनी फॅमिली प्लॅनिंग का निवडले. त्यांनी दिलेल्या या बातमी नंतर त्याचे सगळे चाहते खूप खुश झाले आहेत. सगळेजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
त्याच्या या फोटोवर अनेक कलाकार देखील कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या या फोटोवर कमेंट करत कार्तिक आर्यनने लिहिले आहे की, “खूप खूप शुभेच्छा.” दुसरीकडे सनी सिंगने लिहिले आहे की, “तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा, दोघांना खूप प्रेम.” यासोबतच अनेक कलाकार कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.
अपारशक्ती खुराना आणि आकृती खुराना यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या खूप वर्षानंतर त्यांनी ही गोड बातमी दिली आहे. त्या दोघांची पहिली भेट एका डान्स क्लासमध्ये झाली होती. अपारशक्ती शेवटचा वरुण धवन आणि श्रद्धा कपूर सोबत ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटात दिसला होता. तो लवकरच ‘हेल्मेट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…