बाॅलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची प्रेयसी जॉर्जिया एंड्रियानी त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेत असतात. अरबाज आणि जॉर्जिया गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहे आणि दोघे अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसले आहेत. अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा सोशल मीडियावर येत असतात. मात्र, आता दोघांशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अरबाज आणि जॉर्जियाचे ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे.
जॉर्जिया एंड्रियानी (giorgia andriani) हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरबाज खान ( arbaaz khan) आणि त्याच्यासोबतच्या नातेसंबंधावर खुलासा केला. यादरम्यान तिने सांगितले की, “अरबाज आणि ते फक्त चांगले मित्र आहेत.” इतकंच नाही, तर दोघांमध्ये लग्न असं काही नसल्याचंही तिने म्हटलं आहे. लॉकडाऊननंतरच त्यांच्या नात्यात बरेच बदल झाले आहेत. ती अरबाज आणि मलायकाच्या कुटुंबाला अनेकदा भेटल्याचेही तिने सांगितले.
View this post on Instagram
जॉर्जिया एंड्रियानी म्हणाली की, “मी आणि अरबाज फक्त चांगले मित्र आहोत, पण जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा मी तुम्हाला खरं सांगते, आमचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. आम्हाला लॉकडाऊनने असा विचार करायला भाग पाडले आहे. खरं तर लॉकडाऊनने लोकांना एकतर जवळ आणलं आहे किंवा दूर नेले आहे.” जॉर्जियाच्या या वक्तव्यानंतरच दोघांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ब्रेकअप झाल्यानंतरही अरबाज आणि जॉर्जिया त्यांच्या नात्यात कटुता येऊ देत नाहीत. याआधी अरबाज खाननेही आपल्या एका मुलाखतीत लग्नाबाबत बोलणे घाईचे असल्याचे सांगितले होते.
विशेष म्हणजे अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या वयात 22 वर्षांचे अंतर आहे. अरबाज जॉर्जियापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे आणि त्यामुळे दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे, पण दाेघेही लोकांच्या बोलण्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात. ( bollywood actor arbaaz khan giorgia andriani break up actress said we just friend no marriage plan)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा प्रथमेश परब दिल्लीच्या रेड लाईट एरियामध्ये जातो, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा
“वैयक्तिक मतांना मान्यता…”, लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका