Wednesday, June 26, 2024

‘मित्रांनो, हे नशेत असलेले…’, धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर जाेरदार दारू पार्टी; अभिनेत्याने स्वत:च शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते कायमच काही ना काही पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. अशात आता धर्मेंद्र यांनी असा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांचे खास मित्र फार्म हाऊसमध्ये दारू पार्टी करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये धर्मेंद्र (dharmendra) यांच्या फार्म हाऊसवर त्यांचे मित्र पार्टी करत असल्याचे दिसत आहे. प्रत्येकाच्या हातात दारूचा ग्लास आहे. अभिनेते व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. तितक्यात त्यांचा एक मित्र कॅमेऱ्यासमोर म्हणतो, ‘चीयर्स पाजी, सगळे म्हणतात की, धरमजींनी दारू सोडली आहे. मात्र, पाजींनी दारू सोडली नाही. कधीही सोडली नाही. मी त्यांच्यासोबत दारू पितो.’ यानंतर, अभिनेत्याचे मित्र एक उशी उचलतात, ज्यामध्ये अभिनेत्याचा जुना फोटो आहे. फोटोमध्ये अभिनेत्याने हातात ग्लास घेतलेला दिसत आहे. मित्र पुढे म्हणतात, ‘पाजी चिअर्स. आज एप्रिल फूल आहे. एप्रिल फूल च्या शुभेच्छा.’

हा व्हिडिओ पोस्ट करत धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मित्रांनो, हे नशेत असलेले मित्र मला भेटण्यासाठी माझ्या फार्म हाऊसवर आले होते’. अशा प्रकारे धर्मेंद्र आणि त्यांच्या मित्रांनी मिळून चाहत्यांना एप्रिल फूल बनवले आहे. काही वर्षांपूर्वी धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत दारू सोडल्याचे सांगितले होते.

सण 2013मध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान धर्मेंद्र यांनी खुलासा केला की, त्यांनी आता दारू पिणे सोडले आहे. ते म्हणाले, ‘मी आजकाल पीत नाही. मद्यपानाच्या सवयीमुळे मी एक अभिनेता म्हणून खूप पूर्वीपासून स्वतःला उद्ध्वस्त केले होते. माझा आता मानवतेवर विश्वास आहे.’

धर्मेंद्र यांनी 1960मध्ये अर्जुन हिंगोरानीच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, ज्यानंतर ते 1970 च्या दशकात अॅक्शन स्टार बनले. अशात आता धर्मेंद्र करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी  चित्रपटगृहात प्रदर्शित हाेणार आहे.(bollywood actor dharmendra shares funny video of drinking session with friends at farm house watch video )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जाहिरातींमधून अभिनय काराकिर्दीची केली सुरुवात; आज आहेत बाॅलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स, एकदा पाहाच यादी

रवी किशन यांच्या सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांवरील ‘त्या’ वक्तव्यावरून जया बच्चन यांनी त्यांना सुनावले होते खडेबोल

हे देखील वाचा