Tuesday, July 9, 2024

माधुरी दीक्षितचे लग्न झाल्यावर ‘भिडू’ जॅकी श्रॉफ यांना झाले होते खूप दुःख, मुलाखतीत केला होता खुलासा

बॉलिवूडमधील सौंदर्यवती, ‘धकधक गर्ल’ म्हणजे माधुरी दीक्षित. तिने तिच्या अभिनयाने, डान्सने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावले आहे. तिने अनेक सुपरहिट कलाकारांसोबत काम केले आहे. त्या काळात केवळ प्रेक्षकच नव्हे, तर अनेक कलाकार देखील तिच्या प्रेमात होते. या यादीत समावेश होतो तो म्हणजे ‘भिडू’ जॅकी श्रॉफ यांचा.

खूप कमी प्रेक्षकांना ही गोष्ट माहीत असेल की, जॅकी श्रॉफ यांना माधुरी दीक्षित खूप आवडत होती. या गोष्टीचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत देखील केला होता. ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की, अशी कोणती अभिनेत्री आहे तिचे लग्न झाल्याने तुम्हाला खूप दुःख झाले. या प्रश्नावर जॅकी श्रॉफ यांनी माधुरी दीक्षितचे नाव घेतले होते.

खरंतर ही पहिली वेळ नाहीये जेव्हा कोणत्या अभिनेत्याने तिच्यावर असलेल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. अनेक कलाकारांना ती आवडते. रणबीर कपूरने देखील एकदा त्याला माधुरी दीक्षित खूप आवडते असे एका मुलाखतीत सांगितले होते. माधुरी दीक्षितचे चाहते जगभरात पसरलेले आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. वयाच्या 54 व्या वर्षी देखील तिचे सौंदर्य आणि फिटनेस बघून सगळेच तिच्याकडे आकर्षित होतात.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘डान्स दीवाने ३’ या शोला जज करत आहे.

माधुरी दीक्षितने 1999 मध्ये श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले आहे. श्रीराम नेने हे डॉक्टर आहेत. तसेच माधुरी दीक्षितला दोन मुले आहेत. त्यांचे नाव अरिन आणि रायन असे आहे.(bollywood actor jackie shroff shows his love  for madhuri dixit)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल पाच वर्षांनी दीपिका पदुकोणचा सिनेमा झाला हिट, भावनिक होत म्हटले शाहरुखला धन्यवाद

पार्टीतून बाहेर येताच पॅपराझींना पाहून लाजली जान्हवी; पाहा कोण व्यक्ती होता अभिनेत्रीसोबत

हे देखील वाचा