Saturday, June 29, 2024

वेणीमध्ये दिसणारी ही मुलगी आहे ‘टीव्ही क्वीन’, लाखाे हृदयांवर करते राज, ओळखा बरं काेण?

सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आपल्या आवडत्या स्टार्सचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. एवढेच नाही तर चाहते आपल्या आवडत्या स्टारला ओळखण्याचे आव्हानही घेताना दिसतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी टीव्ही आणि चित्रपटांशी संबंधित अशा स्टारचे फोटो घेऊन आलो आहोत, ज्याला ओळखूने तुमच्या साठी एक टास्क पेक्षा कमी नाही.

आज आपण ज्या स्टारबद्दल बोलत आहोत ती ‘टीव्ही क्वीन’ म्हणूनही ओळखली जाते. तिने एक-दोन नव्हे तर अनेक अभिनेते-अभिनेत्री टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीला दिले आहेत. इतकंच नाही तर अनेक कलाकारांचे नशीबही तिने बदलले आहे. ही ‘टीव्ही क्वीन’ बॉलिवूडच्या मेगा स्टारची मुलगी आहे. तिच्या भावांनीही चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आहे.

आत्तापर्यंत तुम्हाला समजले असेल की, आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. ही दुसरी कोणी नसून सुप्रसिद्ध निर्माती एकता कपूर आहे. एकता कपूरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. टीव्हीची शान असलेल्या एकता कपूरने इंडस्ट्रीला असे अनेक कलाकार दिले आहेत ज्यांनी नंतर चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले आहे.

ekta kapoor
Photo Courtesy: Instagram

एकता कपूरची जुनी मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ असो किंवा ‘नागिन’ असो, टीआरपीच्या बाबतीत कोणीही एकता कपूरला टक्कर देऊ शकत नाही. एकता कपूर अनेक वर्षांपासून छाेट्या पडद्यावर राज्य करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

एकता आहे करोडोंची मालकिन
एकता कपूर ही सुपरस्टार जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी आहे. एकताचा भाऊ तुषार कपूर यानेही चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, त्याला बहिणीप्रमाणे यश मिळाले नाही. एकताने एक अतिशय यशस्वी बिजनस वुमन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, बालाजी टेलिफिल्म्सची मालकीण असलेल्या एकताची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकता अजूनही अविवाहित आहे आणि तिचे आई-वडील आणि भावासोबत खूप चांगले संबंध आहेत.(bollywood actor jeetendra daughter ekta kapoor tv queen rare childhood photo went viral still unmarried balaji telefilms owner personal)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा दमदार अ‍ॅक्शन पॅक्ड टिझर प्रदर्शित

‘पैशाने यश मोजणारे मूर्ख’, म्हणत कंगना रणौतने नाव घेता साधला ‘पठाण’वर निशाणा

हे देखील वाचा