Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

मृत्यू आधी जिया खानवर शारीरिक अत्याचार करायचा सूरज पांचोली, अभिनेत्रीच्या आईचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचे निधन होऊन बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण आजही तिच्या आत्महत्येचे रहस्य उलगडलेले नाही. २०१३ मध्ये मुंबईत आत्महत्या केलेल्या अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने बुधवारी विशेष न्यायालयात सांगितले की, अभिनेता सूरज पांचोली तिच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. सूरज पांचोलीचे जिया खानसोबत अफेअर होते आणि अभिनेत्रीला आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग करत आहे. पांचोली सध्या जामिनावर बाहेर आहे.

जिया खान(Jiah Khan)हिची आई राबिया खान यांनी विशेष न्यायाधीश ए एस सय्यद यांच्यासमोर या प्रकरणात त्यांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली. त्यांनी कोर्टाला जियाचा बॉलिवूडमधील प्रवेश, तिचे करियर, यश आणि पांचोलीसोबतचे नाते याबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, पांचोलीने जिया खानशी सोशल मीडिया साइटद्वारे संपर्क साधला आणि त्याने तिला भेटण्यासाठी दबाव आणला. ते म्हणाले की, सुरुवातीला जिया खान भेटण्यास तयार नव्हती. मात्र, दोघे सप्टेंबर २०१२ मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. राबिया खान कोर्टात म्हणाली, त्यावेळी जियाने मला काही फोटो पाठवले होते. ज्याला पाहून असे वाटले की दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. पण जियाने मला सांगितले की ते फक्त मित्र आहेत.

सूरज पांचोलीने जियावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली
राबिया खान कोर्टात म्हणाल्या की, ‘त्यावेळी जियाने मला काही फोटो पाठवले होते आणि असे वाटले की, त्यांनी हे फोटो काढले आहेत आणि दोघांनाही एकमेकांमध्ये रस होता… पण सप्टेंबरमध्ये तिने मला सांगितले की ते फक्त मित्र आहेत.’ त्या म्हणाल्या की, पांचोलीने त्यांच्या मुलीच्या दैनंदिन जीवनावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि ऑक्टोबर २०१२ पर्यंत दोघे एकमेकांच्या घरी राहू लागले. त्या म्हणाल्या की, त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये जिया लंडनमध्ये आपल्या घरी पोहोचली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. राबिया खानने न्यायालयाला सांगितले की, २४ डिसेंबर २०१२ रोजी जियाला पांचोलीचा एक मेसेज आला होता, ज्यात असे म्हटले होते की, मित्रासोबत झालेल्या भांडणानंतर तो जियावर रागावला होता. तो त्यांची क्षमा मागतो. यादरम्यान जिया खानच्या आईला त्यांच्या भांडणाची माहिती मिळाली.

सूरज जियासमोर इतर मुलींसोबत फ्लर्ट करायचा
जिया खानने त्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही गोव्याला गेले पण तिने एका फोन कॉलमध्ये ती जागा विचित्र असल्याची तक्रार केली होती. तसेच म्हणाली होती की, तिला तिथे रहायचे नाही. आपल्या मुलीशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, गोव्यात पांचोली इतर मित्रांसमोर जियाचा अपमान करायचा आणि तिच्या उपस्थितीत इतर महिलांशी फ्लर्ट करायचा. त्यांनी म्हटले की, जिया १४ फेब्रुवारी २०१३ रोजी अचानक लंडनला पोहोचली आणि खूप उदास दिसत होती.

जियाने गळफास घेऊन केली होती आत्महत्या
राबिया खानच्या म्हणण्यानुसार, जियाने त्यांना सांगितले की पांचोली तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा आणि तिला ‘अभद्र नावाने’ हाक मारायचा. राबिया खान यांची साक्ष आजही सुरू राहणार आहे. राबिया यांच्या म्हणण्यानुसार, ‘निशब्द’ या हिंदी चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मला माफ करा…’ शेहनाज गिलने ‘या’ कारणामुळे मागितली प्रेक्षकांची माफी

तब्बूला बॉक्स ऑफिस कलेक्शनची चिंता नाही; म्हणाली की, ‘आमचे पैसे…’

‘त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो’, ‘त्या’ व्यक्तीच्या आठवणीत जितेंद्र जोशी व्याकूळ

हे देखील वाचा