Saturday, June 29, 2024

कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा

अभिनेता कबीर बेदी बॉलीवूडमध्ये त्यांच्या दमदार आवाज आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाताे. ‘ताजमहल’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कबीर बेदींनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याची त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चा झाली. कबीरने आपल्या आयुष्यात चार लग्न केले. वयाच्या 70 व्या वर्षी अभिनेत्याने त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत चौथ्यांदा लग्न करून सर्वांनाचा आश्चर्यचकित केले.

माध्यमातील वृत्तानुसान, कबीर बेदी (kabir bedi) यांचे पहिले लग्न घाईघाईत झाले होते. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, त्याने अंबा सन्याल नावाच्या मुलीशी लग्न केले होते, परंतु यादरम्यान तो 19 वर्षीय मॉडेल प्रोतिमा गुप्तासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. कबीरसोबत राहताना प्रोतिमा गुप्ता प्रेग्नेंट झाली. यानंतर कबीर बेदींनं अंबा सन्यालसोबतचे लग्न तोडून प्रोतिमाशी लग्न केले. लग्नानंतर प्रोतिमाने मुलगा सिद्धार्थ बेदीचे स्वागत केले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि पुढे मुलगा सिद्धार्थने आत्महत्या केली. ज्यानंतर काही दिवसातच प्रोतिमानेही या जगाचा निराेप घेतला. आपल्या मुलाच्या मृत्यूने कबीर इतका तुटला की, त्याने मुलाच्या आत्महत्येसाठी स्वतःलाच जबाबदार धरायला सुरुवात केली.

कबीरचे दुसरे लग्न ब्रिटीश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रेजशी झाले होते. सुसान आणि कबीर यांना एक मुलगाही आहे. मात्र, हेही लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर कबीरने तिसरे लग्न निक्कीशी केले, जी टीव्ही आणि रेडिओ प्रेजेंटर होती. हे लग्न 15 वर्षे टिकले आणि नंतर दाेघेही विभक्त झाले. निकीला घटस्फोट दिल्यानंतर कबीर बेदीने गर्लफ्रेंड परवीन दोसांझसोबत लग्न केले. परवीन दोसांझचे लग्न होताच कबीरने नेटिझन्सचे लक्ष्य वेधले. कारण, कबीर त्यावेळी 70 वर्षांचा होता आणि परवीन त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान होती.

कबीर याच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘खून भरी मांग’, ‘मैं हूं ना’, ‘कच्चे धागे’, ‘ताजमहाल’, ‘काइट्स’, ‘ब्लू’ यासारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेखासोबतचा ‘खून भरी मांग’ हा त्यांचा सर्वाधिक हिट चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटात रेखाच्या पतीच्या भूमिकेसाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली.(bollywood actor kabir bedi love life married 4 times after rekha on screen husband felt guilty after losing son siddharth)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाप रे! ऋषी कपूरने दारूच्या नशेत केलेले नीतू कपूरशी लग्न, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

हे देखील वाचा