Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन कपिलचे सहकलाकार का निघून जातात? काॅमिडियन म्हणाला, ‘मला टक्कर देत…’

कपिलचे सहकलाकार का निघून जातात? काॅमिडियन म्हणाला, ‘मला टक्कर देत…’

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या ‘झ्वीगॅटाे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 17 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित हाेण्यापुर्वी कपिलने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. यादरम्यान कपिलने कृष्णा अभिषेक, भारती सिंह आणि अली असगर यांच्यासोबतच्या मतभेदाच्याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हणाला काॅमेडियन? चला जाणून घेऊया…

कपिल शर्मा (kapil sharma) याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, ‘त्याच्या आणि ‘द कपिल शर्मा शो’ सोडलेल्या कलाकारांमध्ये कोणतेही वैर नाही.’ कृष्णा अभिषेक, भारती सिंग, सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंग ही अनेक प्रसिद्ध नावं आहेत ज्यांनी शो सोडला आहे. कपिलने सांगितले की, “तो कधीही इनसिक्योर राहिला नाही आणि त्याला नेहमीच असे लोक सापडले आहेत, ज्यांचे काम त्याला आवडते.’ त्याने कबूल केले की, ‘तो पूर्वी खूप रागावला होता, परंतु आता त्याने त्यावर काम केले आहे.’

जेव्हा कपिलला विचारण्यात आले की, त्याचे सहकलाकार का निघून गेले, तेव्हा तो म्हणाला, “ते का थांबले नाहीत त्यांना विचारा, मी माझ्या जागेवर आहे. माझे सुनील ग्रोवर बरोबर भांडण झाले, ठीक आहे. मात्र, भारती सिंग, तुम्ही इंस्टाग्रामवर बघितले, तर आम्ही एकत्र बसतो. भारतीने तिचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. ती स्वतःचे काम करत आहे आणि खूप व्यस्त आहे. जे गेले ते माझ्याशी भांडले असे नाही. उपासना सिंग चित्रपटांमध्ये उत्तम काम करत आहे. आम्ही काही दिवसांपूर्वीच बोललो होतो. कृष्णा एक चांगला मित्र आहे, पण मग तुम्ही सुनील सोडून सगळ्यांना एकाच श्रेणीत टाकू शकत नाही.”

कपिलने असेही सांगितले की, ‘तो आता निर्माता नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट इश्यूमुळे काेणीही शाे साेडत असेल, तर त्यात माझी भूमिका नाही’. तो पुढे म्हणाला, “मला कधीच वाटत नाही की, कोणी मला टक्कर देत आहे. याचा मला कधीच ताण आला नाही. जेव्हा तुम्ही शो तयार करता तेव्हा तुम्हाला 10 गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. मात्र, आता त्यातून मी मुक्त झालाे आहे, मी डॉन आहे. मी प्रोड्यूस करत नाही. माझा चॅनलशी थेट कॉन्ट्रॅक्ट आहे. मी कृष्णावर प्रेम करतो, पण त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय अडचण होती हे मला माहीत नाही.” असे कपिलचे म्हणणे आहे. (bollywood actor kapil sharma clarifies rivalry with sunil grover krushna abhishek bharti singh ali asgar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये ‘या’ अभिनेत्याने शेअर केली बाबा आनंदाची झाल्याची बातमी, पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद

स्वराच्या लग्नात दिग्गज नेते मंडळींचा समावेश; पण युजर्सकडून राज्यसभा महिला खासदार ट्राेल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा