Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी चिमुकल्या चाहत्याने केलं असं काही की….; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया 2’ च्या शानदार यशानंतर कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) याची लोकप्रियता वाढली आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनने केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर तो त्याच्या चाहत्यांच्या जवळही आला आहे. त्याचवेळी, अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो जोधपूर विमानतळावर दिसत आहे. अशातच कार्तिक आणि त्याच्या चिमुकल्याचा चाहत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कार्तिकने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

कार्तिक विमानतळावर छोट्या चाहत्याला भेटला
नुकताच कार्तिक आर्यन एका कार्यक्रमासाठी जोधपूरला पोहोचला होता. विमानतळावरून ते मुंबईला परतत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कडक बंदोबस्तामुळे त्याच्या चाहत्यांना त्याला भेटता आले नाही. कार्तिकला पाहताच त्याच्या चिमुकल्या चाहत्यानं त्याला गेटवरुनच हाक मारायला सुरुवात केली. कार्तिकला पाहून चाहता भावूक झाला. त्याने या चाहत्यासोबत फोटोसाठी पोज दिली आणि त्याला ऑटोग्राफही दिला. कार्तिकच्या या ‘डाऊन टू अर्थ’ वागण्याने चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या या वागणुकीविषयी नेटकऱ्यांकडून त्याचं कौतुक होत आहे.

कार्तिकचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
एका युजरने कार्तिक आर्यनसाठी लिहिले की,’लोकांनासुद्धा सेल्फ मेड अभिनेत्याची कदर असते, हम्बल, खरा सुपरस्टार, लव, क्युट’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. व्हिडीओला नेटकऱ्यांचं भरभरुन प्रेम मिळताना दिसतंय.

दरम्यान, कार्तिक आर्यन शेवटचा ‘भूल भुलैया 2’ मध्ये दिसला होता. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता, त्यानंतर हा अभिनेता मुलांमध्येही खूप लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केला. यात कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. यानंतर कार्तिककडे ‘कॅप्टन इंडिया’, ‘आशिकी 3’, ‘शेहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ सारखे चित्रपट आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘स्पर्धाच घेऊ नका…’ पुरुषोत्तम करंडकाच्या निकालावर विजू माने यांची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल
आठवडा ठरणार हाऊसफूल! ‘हे’ चित्रपट घालवणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
एवढी घेतली की चालताही येईना? व्हायरल व्हिडिओमुळे अभिनेत्री सारा अली खान झाली ट्रोल

हे देखील वाचा