Monday, July 1, 2024

केआरकेला ‘या’ अभिनेत्याला ‘ड्रग अॅडिक्ट’ म्हणणे पडले महागात, तक्रारीवरून कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट

कमाल आर खान स्वत:ला एक उत्तम अभिनेता आणि नंबर 1 फिल्म क्रिटिक मानताे. मात्र, हा अभिनेता चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावर त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. कमाल आत्तापर्यंत बी-टाऊनच्या अनेक स्टार्ससोबत अडचणीत सापडला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी तुरुंगाची हवाही खाल्ली आहे. गेल्या वर्षी कमालने बहुप्रतिभावान अभिनेते मनोज बाजपेयी यांना ‘ड्रग अॅडिक्ट’ म्हटले होते. या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या मनोज बजायेपी यांनी कमालविरोधात तक्रार दाखल केली, त्यावर आता न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे.

कमाल रशीद खान (krk) उर्फ ​​केआरकेने 26 जुलै 2021 रोजी दोन ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी (manoj bajpayee) यांना ‘चरसी-गंजेडी’ असे संबोधले. अशात मनोज बाजपेयी यांना हे ट्विट अजिबात आवडले नाही आणि त्यांनी केआरकेविरोधात इंदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अभिनेत्याच्या या तक्रारीवरून आता इंदूर न्यायालयाने कठोर पावले उचलत केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

केआरकेने आपल्या ट्विटद्वारे अभिनेत्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार मनोज बाजपेयी यांनी केली आहे. या तक्रारीवर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर इंदूर न्यायालयाने कमलविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट जारी केल्यानंतर, कमलला पुढील महिन्यात म्हणजेच 10 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहावे लागेल.

अशात कमाल आर खान यानेही अटक वॉरंटच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. मनोज बाजपेयी यांच्या विरोधात ज्या अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आले होते ते अकाऊंट त्याने विकल्याचे अभिनेत्याने म्हणणे आहे. केआरकेने दावा केला आहे की, ‘हे ट्विट त्याच्या वतीने नाही, तर अकाऊंटच्या नवीन मालकाच्या वतीने करण्यात आले आहे.’ कमालने जेएमएफसीसमोर सांगितले की, ‘तो कॅन्सरने ग्रस्त आहे आणि त्याला जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाकडून खूप आशा आहे.'(bollywood actor krk will reach behind the bars court issues arrest warrant on manoj bajpayee complaint)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन, 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कंगना रणौत इंडस्ट्रीतील कोणालाही तिच्या घरी बोलवू इच्छित नाही! अस का म्हणाली अभिनेत्री?

हे देखील वाचा