Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘सुलतान’ फेम अभिनेते कुमुद मिश्रांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर श्वास घेण्यास त्रास, रुग्णालयात आहेत ऑक्सिजन सपोर्टवर

‘सुलतान’ फेम अभिनेते कुमुद मिश्रांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर श्वास घेण्यास त्रास, रुग्णालयात आहेत ऑक्सिजन सपोर्टवर

‘सुलतान’, ‘एमएस धोनी: द अन टोल्ड स्टोरी’, ‘जॉली एलएलबी 2’, ‘भारत’ यांसारख्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे अभिनेते कुमुद मिश्रा यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. ते मध्यप्रदेश मधील एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याची बातमी समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कुमुद यांची तब्बेत आता ठीक आहे. पण अजूनही ते ऑक्सिजनवर आहेत. डॉक्टर्स त्यांच्या तब्बेतीची काळजी घेत आहेत. याआधी कुमुद यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांची काळजी घेताना कुमुद त्यांच्यासोबत होते, तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची आई देखील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

कुमुद मिश्रा यांच्या बाबतीत ही गोष्ट खूप कमी जणांना माहित असेल की, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ते अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे सिनियर होते. एका मुलाखतीत त्यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबद्दल बोलताना सांगितले होते की, “नवाजुद्दीन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये माझा ज्युनिअर होता. मी त्याचे काम सुरुवातीपासून पाहिले आहे. तो जेवढे मन लावून काम करतो ते त्याने सुरुवातीपासूनच केले आहे.” कुमुद मिश्रा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी वरुण धवनसोबत ‘बदलापूर’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

कुमुद मिश्रा यांनी पत्नी आयशा रजा देखील बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने ‘मदारी’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘सोनू के टिट्टू की स्विटी’, ‘गुंजन सक्सेना: कारगिल गर्ल’ या चित्रपटात काम केले आहे. कुमुद आणि आयशा यांचे लग्न 2008 मध्ये झाले होते. त्यांना कबीर नावचा एक मुलगा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारनंतर आता पत्नी ट्विंकल खन्नाही आली कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून, थेट यूकेवरून मागवणार १०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स

-‘वयाच्या १२ व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, म्हणत अभिनेत्री इलियाना डिक्रूजने केले भाष्य

-‘तुम्ही भारताला कोरोना लसीचा पुरवठा करू शकता का?’ भारताची वाईट परिस्थिती पाहून प्रियांका चोप्राचे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ट्वीट

हे देखील वाचा