Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड मनाेज वाजपेयीच्या अभिनयाला चाहत्यांची दाद; नव्या सिनेमाचा ट्रेलर पाहून म्हणाले, ‘ऑस्कर देऊन टाका…’

मनाेज वाजपेयीच्या अभिनयाला चाहत्यांची दाद; नव्या सिनेमाचा ट्रेलर पाहून म्हणाले, ‘ऑस्कर देऊन टाका…’

अभिनेता मनोज वाजपेयी यांचा आगामी चित्रपट ‘सिर्फ एक बंदा काफी है’च्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलर प्रेक्षकांना सामर्थ्यवान लोकांचे वर्चस्व असलेल्या जगाची ओळख करून देताे आणि एक साधा माणूस कशाप्रकारे न घाबरता त्याच्या विलक्षण धैर्याने पुढे जाताे, सत्य आणि न्यायासाठी जगताे याचे चित्रीकरण केले आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला एका बाबाची झलक पोलीस व्हॅनमधून खाली उतरताना दिसत आहे, ज्याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयात 5 वेळा फेटाळण्यात आला आहे. अशात आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून एका पावरफुल वकिलाचा आधार घेतला आहे. मात्र, त्यापैकी कोणीचीही सामान्य वकिल म्हणजेच मनाेज बाजपेयी याच्या समाेर एक चालत नाही. अशात अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त दिसत आहे.

लोक चित्रपटातील आशयाचे आणि मनोज वाजपेयीच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. मनोज वाजपेयीचा अभिनय पाहून एक युजरने कमेंट करत लिहिले, ‘एवढा उत्तम अभिनय, त्याला ऑस्कर द्या, नाहीतर हा टॅलेंट वाया जाईल.’, तर एकाने कमेंट करत लिहिले, ‘एसएस राजामौली यांनी मनोज वाजपेयी यांना त्यांच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका घ्या.’

 

या चित्रपटात पीसी सोलंकीची भूमिका साकारणारा मनोज वाजपेयी प्रेक्षकांना विजय, पराजय आणि बलिदानाच्या अतुलनीय कथेची ओळख करून देताे. ‘सिर्फ एक बंदा काफी है’मध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून जुही पारेख मेहता सहनिर्माते आहेत. हा चित्रपट 23 मे 2023 रोजी केवळ ZEE5 वर प्रीमियर होणार आहे.(bollywood actor manoj bajpayee sirf ek bandaa kaafi hai movie trailer released people praising the family man star acting skills watch)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग कश्यपच्या मुलीचा गुपचुप आटाेपला साखरपुडा, बॉयफ्रेंडला लिप किस करत दिली माहिती

सारा अली खानचा भाऊ लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे शूटिंग केले पूर्ण

हे देखील वाचा