मनोज बाजपेयीने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक पात्राने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्याने वेळोवेळी आपल्या अभिनयाने स्वतःला सिद्ध केले आहे आणि इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा कधीही विसरता येणार नाही. अशातच आता या टॅलेंटेड अभिनेत्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी समाेर आली आहे. अभिनेत्याने आपल्या सर्व चाहत्यांना अकाऊंटशी कोणत्याही प्रकारचा संवाद टाळण्याचे आवाहन केले आहे.
मनोज (manoj bajpayee) याने शुक्रवारी (दि. 6 जानेवारी)ला सकाळी इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले की, “माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आज माझ्या प्रोफाईल वरून येणाऱ्या कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका. विशेषत: जोपर्यंत या प्रकरणाशी संबंधित समस्येचे निराकरण होत नाही तोपर्यंत तरी नाही. मी माझ्या या पोस्टद्वारे तुम्हा सर्वांना माहिती देत आहे.”
सध्या तरी अभिनेत्याच्या ट्विटर प्रोफाइलवर काेणत्याही प्रकारची असामान्य गोष्ट दिसलेली नाही. आतापर्यंत त्यांच्या खात्यावर केवळ त्यांच्या कामाच्या पोस्ट दिसत आहेत. त्यापैकी फक्त एक पोस्टचा रिट्विट आहे, ज्यामध्ये चाहत्यांना जॉन अब्राहमसोबतचा त्याचा ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपट पाहण्यास सांगितले आहे, तर दुसरा ट्विट दिल्लीतील थंड हवामानाबद्दल बोलत आहे. याशिवाय त्याच्या टाइमलाइनवर त्याच्या कामाचे चाहत्यांनी कौतुक केलेले रिट्विट दिसत आहेत.
एखाद्या सेलिब्रिटीचे अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी या अपघाताचे बळी ठरले आहेत. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांचे ट्विटर अकाउंटही हॅक झाले होते. त्याच्या अकाउंटवर इंग्रजी भाषेत काही ट्विट करण्यात आले होते. इतकेच नाही, तर ज्युनियर बिग बींच्या खात्याचे नावही बदलण्यात आले हाेते.(bollywood actor manoj bajpayee twitter account hacked actor shares painful story on instagram asks fans to stary away from profile )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साऊथचा सुपरस्टार विजय थलापति घेणार घटस्फोट? वाचा व्हायरल झालेल्या बातमीचे सत्य
‘साक्षात प्रभू आल्याचा भास’, अरुण गोविल यांना भेटून भावुक झाले स्वामी जगद्गुरु रामभद्राचार्य