नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. देशात आणि जगात आपल्या अभिनयाचं नाणं प्रस्थापित केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने शनिवारी (दि. 28 जानेवारी)ला सुपरस्टार व्यंकटेशसोबतचा त्याचा तेलुगू डेब्यू चित्रपट ‘सैंधव’ची घोषणा केली. नवाजुद्दीनने ट्विटरवर अनेक फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना या बातमीची माहिती दिली. शैलेश कोलानू दिग्दर्शित या चित्रपटात राणा डग्गुबती आणि नागा चैतन्य देखील दिसणार आहेत.
पहिल्या फाेटाेत, नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) चित्रपटाच्या सेटवर व्यंकटेश, राणा दग्गुबती, नागा चैतन्य आणि इतरांसोबत पोज देत आहे. तर दुसऱ्या फाेटाेत व्यंकटेश आणि नवाजुद्दीन एकमेकांचा हात धरलेले दिसत आहेत आणि अखेरच्या फाेटाेमध्ये नवाजुद्दीन भगवान हनुमानाच्या फोटो फ्रेमसमोर प्रार्थना करताना दिसत आहेत.
ही फाेटाे शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्वात उत्साही व्यक्ती असलेल्या व्यंकटेश दग्गुबतीच्या 75व्या चित्रपट ‘सैंधव’सोबत काम करणे खूप शानदार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोलानू करत आहेत. नुकताच शैलेशने नवाजुद्दीनसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. फाेटाे शेअर करत त्याने लिहिले की, ‘आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक नवाजुद्दीन सिद्दीकी भेटल्याने खूप आनंद झाला आहे. तो वेडा होणार आहे, मी तुम्हाला खात्री देतो.’
View this post on Instagram
सैंधव हा एक अखिल भारतीय ऍक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये व्यंकटेश मुख्य भूमिकेत आहे. निहारिका एंटरटेनमेंट या बॅनरखाली वेंकट बोयनपल्ली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे, पण नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.(bollywood actor nawazuddin siddiqui announced south debut telugu film saindhav with venkatesh rana rana daggubati shares photo)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गे व्यक्तीशी लग्न…’, नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंग, एकादा वाचाच
जेव्हा सुमन कल्यामपुर यांच्याकडून हिसकावण्यात आलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’, वाचा काय आहे कारण