Wednesday, June 26, 2024

नवाजुद्दीने पत्नीबाबत केला माेठा खुलासा; म्हणाला, ‘याआधीही तिने मागितलेली किंमत…’

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू आहेत. आलिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत व्हिडिओ शेअर करत आहे, ज्यामध्ये नवाज आणि त्याचे कुटुंब तिच्यासोबत आणि तिच्या मुलांसोबत किती अमानुष वर्तन करत आहे हे सांगत आहे. आलियाने नवाजवर अनेक आरोप केले आहेत, ज्यावर आता अभिनेत्याने मौन साेडले आहे. 48 वर्षीय नवाजुद्दीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणावर आपले वक्तव्य केले आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

नवाज (nawazuddin siddiqui) याने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “माझ्या मौनामुळे मला संपूर्ण जगासमोर एक ‘वाईट’ व्यक्ती म्हणून सादर केले जात आहे. पण माझ्या गप्प राहण्याचे कारण म्हणजे कुठेतरी माझी मुलं आहेत. सोशल मीडियावर काही लोक माझ्या चारित्र्यला मोठ्या थाटामाटात मांडत आहेत. अशा परिस्थितीत मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत.”

नवाजने तीन पानांत आपले म्हणणे मांडले आहे. त्याने लिहिले की, “सर्व प्रथम, मी आणि आलिया अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा घटस्फोट झाला आहे, आमच्यातली समजूत फक्त मुलांसाठी होती.” दुसऱ्या मुद्द्यात अभिनेता म्हणाला, “माझी मुलं गेल्या 45 दिवसांपासून इथे काय करत आहेत? आणि ते त्यांच्या शाळेत का जात नाहीत? हे कुणाला माहीत आहे का?. मला त्यांच्या शाळेतून रोज गैरहजेरीबद्दल पत्र येत आहे. माझ्या मुलांना 45 दिवसांपासून बंदिवासात ठेवले असून ते 45 दिवसांपासून त्यांच्या शाळेत गेले नाहीत.”

अभिनेत्याने पुढे लिहिले की, “तिने माझ्या मुलांना 4 महिने एकटे सोडले आणि आता त्यांना पैसे मागण्यासाठी येथे बोलावले आहे. गेल्या 2 वर्षांपासून दरमहा 10 लाख रुपये दिले जात आहेत आणि माझ्या मुलांसह दुबईला जाण्यापूर्वी त्यांना दरमहा सुमारे 5 ते 7 लाख रुपये दिले जात होते. या पैशात शाळेची फी, वैद्यकीय खर्च किंवा माझ्या मुलांच्या इतर खर्चाचा समावेश नाही. मी आणखी तीन चित्रपटांना फायनान्स केले आहे, ज्यात मी करोडो रुपये खर्च केले आहेत. हे सर्व यासाठी की, तिने स्वतःला सेटल करावे. कारण, ती माझ्या मुलांची आई आहे.”

माध्यमातील वृत्तांनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची एकूण संपत्ती सुमारे 13 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 96 कोटी रुपये आहे. अभिनेत्याने पुढे लिहिले की, “माझ्या मुलांसाठी तिला महागड्या कार दिल्या होत्या. मात्र, तिने त्या आपल्या खर्चासाठी विकल्या. मी माझ्या मुलांसाठी वर्सोवा येथे एक महागडे घर देखील घेतले आहे, जे आलियाच्या नावावर आहे. कारण, माझी मुले लहान आहेत. मी माझ्या मुलांसाठी दुबईमध्ये एक घरही विकत घेतले आहे. जेणेकरून ते तिथे आरामात राहू शकतील. फक्त जास्त पैशांची मागणी करण्याच्या उद्देशाने ती माझ्यावर आणि माझ्या आईवर अनेक खटले दाखल करत आहे आणि ही तिची सवय आहे. याआधीही तिने मागितलेली किंमत मिळाल्यावर केस मागे घेतली आहे.”

आलियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, तिला आणि तिच्या मुलांना नवाजच्या बंगल्यातून मध्यरात्री बाहेर काढण्यात आले आणि आता तिच्याकडे फक्त 81 रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत तिने मुलांसह कुठे जायचे. या व्हिडिओत नवाजची मुलगीही रडताना दिसत आहे.

नवाजने पुढे लिहिले की, “जेव्हाही माझी मुलं सुट्टीत भारतात येतात, तेव्हा ते आजीसोबत राहतात. त्यांना कोणी कसे बाहेर काढू शकेल? त्यावेळी मी घरीही नव्हतो. ती प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचे व्हिडिओ बनवते, तिला घरातून बाहेर काढताना तिने व्हिडिओ का बनवला नाही?” अभिनेत्याने लिहिले, “ती माझ्या मुलांना या संपूर्ण नाटकात ओढत आहे. कारण, तिला मला ब्लॅकमेल करायचे आहे आणि माझे करिअर बरबाद करायचे आहे.

अभिनेता अखेर म्हणाला, “शेवटी मी म्हणेन की, या जगातील काेणतेही पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे आणि त्यांच्या भविष्याचे नुकसान करू इच्छित नाही. ते नेहमी आपल्या मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. आज मी जे काही कमावत आहे, ते फक्त माझ्या मुलांचे आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही. मला शोरा आणि यानी खूप आवडतात आणि मी त्यांच्या करियरसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.” असे नवाजुद्दीन याने आपल्या वक्तव्यात मांडले.(bollywood actor nawazuddin siddiqui finally breaks silence says i am termed as bad guy claims estranged wife aaliya only wants more money)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बींच्या ‘या’ गीतांशिवाय होळी सणच आहे अपूर्ण; ‘रंग बरसे’ तर आहे सर्वात हिट!

…म्हणून करिना कपूरला होळी साजरी करायला आवडत नाही, आजोबा राज कपूर यांच्याशी संबंधित आहे किस्सा

हे देखील वाचा