Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवाजुद्दीनच्या आईनंं सुने विरुद्धात केला गुन्हा दाखाल, वाचा काय आहे प्रकरण

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी अभिनेत्याची पत्नी झैनबविरोधात एफआयआर दाखल केली आहे, ज्यानंतर वर्सोवा पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले आहे. झैनबचा नवाजुद्दीनच्या आईसोबत वाद झाल्याचा आरोप आहे, जो आता पोलिसांपर्यंत पोहोचला आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) याच्या आईच्या तक्रारीनंतर मुंबई वर्सोवा पोलिसांनी एफआयआरच्या आधारे झैनबला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले आहे. अभिनेत्याची पत्नी झैनब विरुद्ध कलम 452, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीनची आई आणि त्याच्या पत्नीमध्ये मालमत्तेवरून वाद झाला होता, त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली.

झैनब उर्फ ​​आलिया ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. 2010 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, ज्यानंतर कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन दरम्यान दाेघींमध्येही वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघाीनीही एकमेकींवर अनेक गंभीर आरोप केले होते. माध्यमातील वृत्तानुसार, त्यादरम्यान अभिनेत्याच्या पत्नीनेही त्याच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा आरोप केला होता.

नवाजुद्दीन हा बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. अभिनेता टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्या ‘हिरोपंती 2’ मध्ये  नवाजुद्दीन शेवटचा दिसला होता. अभिनेता त्याच्या आगामी दोन चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. तो पुढे ‘टिकू वेड्स शेरू’ आणि ‘बोले चुडिया’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.(bollywood actor nawazuddin siddiqui mother mehrunisa siddiqui filed an fir against the actor wife zainab)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ’, म्हणणाऱ्या श्रेयस तळपदेने त्याच्या पोस्टमधून ‘रेशीमगाठ’बद्दल दिली हिंट
सांगलीच्या पठ्ठ्याचा विषयच वेगळा! ‘पठाण’ सिनेमा पाहण्यासाठी आख्खं थिएटर केलं बुक, शाहरुखही म्हणाला…

हे देखील वाचा