Wednesday, June 26, 2024

‘पिक्चर चले ना चले नवाजुद्दीन चलेगा’, फ्लाॅप चित्रपटांवर स्पष्टच बाेलला अभिनेता

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो. तो आपल्या अभिनयाने रसिकांना प्रभावित करत असताे. मात्र, रसिकांच्या मनावर राज्य करणारे नवाजुद्दीन सिद्दीकी याचे चित्रपट  दीर्घकाळापासून पडद्यावर विशेष कामगिरी करू शकलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या ‘हड्डी’ या चित्रपटातून त्याचा पूर्णपणे वेगळा लूक समोर आला होता. जाे चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अशातच नवाजुद्दीने मुलाखतीदरम्यान त्याच्या करीअरला घेऊन एक माेठा खुलासा केला आहे. 

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui ) याच्या चित्रपटांना गेल्या काही काळापासून जे प्रेम मिळाले आहे, ते त्याच्या आधीच्या चित्रपटांना मिळालेले नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘फोटोग्राफ’, ‘मोतीचूर चकनाचूर’ आणि ‘हिरोपंती 2’ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. याबाबत अभिनेत्याने मुलाखतीदरम्यान सांगितले की, “चित्रपट फ्लॉप झाल्याचा सर्व दोष अभिनेत्यावर टाकला जातो आणि दिग्दर्शकाला विचारले जात नाही.” शाहरुख खानचे उदाहरण देताना नवाजुद्दीन म्हणाला की, “शाहरुख खानचे चित्रपट फ्लॉप होतात किंवा बॉक्स ऑफिसवर पडतात याने काही फरक पडत नाही.”

नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, “मी माझे काम प्रामाणिकपणे करतो आणि मेहनत करण्यास मागे हटत नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, यासाठी दिग्दर्शकावर कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नाही, सर्व दोष अभिनेत्यावर टाकला जातो आणि या अभिनेत्याचा चित्रपट फ्लॉप झाल्याचे बोलले जाते. चित्रपट फ्लॉप झाला, तर चित्रपटाच्या स्टाेरीत काही चूक असेल किंवा दिग्दर्शकाची चूक असेल. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा मला आता काहीच फरक पडत नाही. माझे चित्रपट चालतील किंवा न चालतील, मी नेहमीच धावत राहीन.”

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर अभिनेता लवकरच ‘हड्डी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा करणार आहेत. याशिवाय तो ‘टिकू वेड्स शेरू’, ‘जोगिरा सा रा रा’ आणि ‘नूरानी चेहरे’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. (bollywood actor nawazuddin siddiqui reaction on box office flop of his films says picture chale na chale nawazuddin chalega)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रिलीजनंतर 13व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर राडा करतोय अजयचा ‘दृश्यम 2’, छापले तब्बल ‘एवढे’ कोटी

बापलेकाची जोडी सुसाट! मुलगा आझादसोबत थिरकला आमिर खान, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा