बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या केवळ त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच नाही, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत आहे. अभिनेता लवकरच ‘जोगिरा सारा रा रा‘ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच (12 मे)ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची बातमी होती, मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. ‘जोगिरा सारा रा रा’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून हा चित्रपट आता पुढच्या शुक्रवारी म्हणजे (26 मे) तारखेला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, ‘द केरळ स्टोरी’ला प्रेक्षकांकडून मिळत असलेला चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही वेळाने हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात नवाज डान्स करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
नुकतेच याबद्दल बोलताना तो म्हणाला की, त्याला डान्स कसा करावा हे माहित नाही आणि चित्रपटात त्याला दिलेल्या स्टेप्स खूप सोप्या होत्या. अशात नेहा शर्माने सेटवर खूप धमाल केली. नवाजच्या डान्सबद्दल बोलताना तो म्हणाला, “सुरुवातीला खात्री नव्हती की, मी हे करू शकेल की नाही, पण जेव्हा मी सेटवर पोहोचलाे आणि नाचू लागलाे तेव्हा मला वाटलं की, सगळे माझ्याचकडे बघत आहेत.”
नवाजुद्दीन सिद्दीकीने केले या दमदार चित्रपटात काम
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘बजरंगी भाईजान’, ‘हिराेपंती 2’, ‘किक’, ‘रईस’, यासारख्या चित्रपटांमध्ये छाेड्या-माेठ्या भूमिका साकाल्या आहेत. (bollywood actor nawazuddin siddiqui starrer jogira sara ra ra postponed due to the kerala story )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट
“ही ओळख आयुष्यभर जपेन” प्रिया बापटने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले लग्नानंतर नाव न बदलण्याचे कारण