खोटे दागिने घालायला दिल्यामुळे भडकला होता अभिनेता; म्हटला, ‘मी नसतोय करत खोटे दागिने घालून काम’


बॉलिवूड मधील दिवंगत अभिनेते राजकुमार हे त्यांच्या काळाचे सुपरहिरो होते. ते आज आपल्यात नाही या गोष्टीची खंत सर्वांनाच आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. पण त्यांचा आठवणीत राहणारा चित्रपट म्हणजे ‘नील कमल’. आज आपण त्यांच्या याच सुपरहिट चित्रपटातील पडद्यामागील काही गोष्टी जाणून घेणार आहोत.1966 मध्ये दिग्दर्शक राम माहेश्वरी हे नील कमल नावाचा एक चित्रपट बनवत होते. या चित्रपटात वहिदा रहमान,राजकुमार आणि मनोज कुमार हे मुख्य भूमिका साकारत होते.

नील कमल चित्रपटात राजकुमार यांचे एका मूर्तिकाराचे पात्र होते. या पात्रासाठी त्यांनी अनेक दागिने देखील घातले होते. जेव्हा या चित्रपटाची शूटिंग चालू झाली तेव्हा राजकुमार हे त्यांच्या या दगिण्यांमुळे खूप नाराज होते. कारण त्यांना घालण्यासाठी खोटे दागिने आणले होते.

त्यावेळी राजकुमार यांनी दिग्दर्शकांना सांगितले की,” मी घातले तर खरे दागिने घालणार नाहीतर शूटिंग करणार नाही.” अनेकांनी त्यांना समजावले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते की, त्यांना खरे दागिने पाहिजे. चित्रपटाची शूटिंग थांबल्यामुळे सेट वरील प्रत्येकजण टेन्शनमध्ये‌ होता की, त्यांना खरे दागिने कुठून आणून द्यायचे.

त्यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शक समोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी खरे दागिने मागवले. पण तोपर्यंत शूटिंग थांबली होते. त्यामुळे खूप नुकसान झाले.

शेवटी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काहीतरी जुगाड करून खऱ्या दागिन्यांची व्यवस्था केली. त्यानंतर राज कुमार यांनी चित्रपटाचा पहिला सीन शूट केला होता. तो चित्रपट बघताना कोणालाच ही गोष्ट समजली नाही की, ते दागिने खरे होते की खोटे होते. परंतु राज कुमार यांच्या हट्टापुढे कोण काय बोलू शकते नव्हते.


Leave A Reply

Your email address will not be published.