Monday, July 1, 2024

बाप रे! ऋषी कपूरने दारूच्या नशेत केलेले नीतू कपूरशी लग्न, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत ओळखले गेले. अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून लोकांची मने जिंकणाऱ्या ऋषी कपूर यांनी कधीही सहमत नसलेली गोष्ट मान्य केली नाही. स्वतःच्या लग्नात घोड्यावर चढण्यापूर्वीच ऋषी कपूर बेहोश झाले हाेते, याला कारणही तशेच हाेते. काय आहे नेमक प्रकरण चला जाणून घेऊया…

बॉलिवूडच्या मोठ्या घराण्यातील चिराग ऋषी कपूर यांनी 22 जानेवारी 1980 रोजी अभिनेत्री नीतू कपूरसोबत लग्न केले. लग्नाच्या वेळेपर्यंत ऋषी कपूरही मोठे स्टार बनले होते. परिणामी या दाेघांच्या लग्नात इन्वाइटेड न केलेल्या पाहून्याची खूप गर्दि झाली हाेती, ज्यामुळे ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. याचा खुलासा ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी केला आहे. नीतू कपूरने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आमचे लग्न चेंबूर, मुंबईतील आरके हाऊसमध्ये 1980 मध्ये झाले होते. कपूर कुटुंबात लग्न असल्याने थाटामाटात होते. मात्र, लग्नाची माहिती मिळताच पाच हजारांहून अधिक लोक येथे पोहोचले. एवढी गर्दी पाहून ऋषी कपूर आश्चर्यचकित झाले आणि घोडीवर बसण्यापूर्वीच बेहोश झाले.”

यासोबतच नीतू कपूरने लग्नाबाबत आणखी एक खुलासा करताना सांगितले की, “लग्नात भेटवस्तूही अनोख्या आल्या. लग्नात अनेकांनी भेटवस्तूंच्या नावावर चप्पल दिली होती. एवढेच नाही तर अनेक जण दगड देऊनही गेले. या लग्नात अनेक प्रकारचे खिसेबाज लोक सहभागी झाले होते. ही गर्दी पाहून मीही अस्वस्थ झाली. इतके पाहुणे पाहून आम्ही दोघेही बेशुद्ध पडलो. यानंतर आम्ही ब्रँडी पिण्यास सुरुवात केली. ऋषी कपूर आणि मी एकत्र ब्रँडी प्यायलो आणि या अवस्थेत सात फेऱ्या मारल्या.”

या मुलाखतीत नीतू कपूरसोबत अनिल कपूरही उपस्थित होता. अनिल कपूरने सांगितले की, “लग्नात 5 हजारांहून अधिक लोक आले होते हेही मी पाहिले. सगळ्यांनी छान कपडे घातले होते त्यामुळे आम्हालाही ते पाहुणे वाटले. पण नंतर कळले की, हे सगळे बिन बुलाए मेहमान होते.”

ऋषी कपूर यांचे 3 वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले.(bollywood actor rishi and neetu kapoor both fainted surprisingly before their wedding drinks brandy during saat pheras )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! ऐश्वर्या रायच्या अडचणी वाढल्या, नाशिक तहसिल अधिकाऱ्याकडून मिळाली नोटिस

गुगली वूगली वूश! शहनाज गिलचा लेटेस्ट लूक पाहिला का?

हे देखील वाचा