बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख होय. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. रितेश सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्याचे चाहते त्याच्या आयुष्यातील घटना जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. तो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडून असतो. अनेकवेळा तो त्याच्या परिवारासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच रितेशने त्याच्या एका वेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रितेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रितेश अगदी वेगळा दिसत आहे. त्याने हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. सोबत त्याने निळ्या रंगाचा प्लाझो घातली आहे आणि पायात काळ्या रंगाचे बूट घातले आहेत. त्याने अगदी मिसमॅच पोशाख परिधान केला आहे. त्याने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Bollywood actor Riteish Deshmukh’s new look viral on social media)
रितेशने शेअर केलेल्या या फोटोवर त्याचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना त्याचा हा लूक आवडला आहे, तर अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत. अनेकजण त्याच्या या लूकची तुलना रणवीर सिंगसोबत करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “रणवीर सिंगकडून प्रेरणा घेतलीय का?” आणखी एकाने कमेंट करत म्हटले की, “अरे रणवीर सिंग.” अशाप्रकारे त्याच्या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
रितेश देशमुखने अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘तुझे मेरी कसम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘एक विलन’, ‘माऊली’, ‘मस्ती’, ‘बाघी ३’ यांसारख्या चित्रपटात तो दिसला आहे. तसेच त्याने मराठीमध्ये ‘लय भारी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’