Thursday, May 1, 2025
Home बॉलीवूड पॅपराझींना पोज दिल्याने पत्नी करीनावर मोक्कार भडकला सैफ? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पॅपराझींना पोज दिल्याने पत्नी करीनावर मोक्कार भडकला सैफ? अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा एक व्हायरल व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेता आपला संयम गमावून पॅपराझींनवर संतापताना दिसला हाेता. अशात आता या प्रकरणी करीनाने यामागचे कारण सांगत आपले मत मांडले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत करीना कपूर खान (kareena kapoor) म्हणाली, “मी काेणतीही सीमारेषा आखत नाही आहे…जर ते क्लिक करत असतील तर त्यांना क्लिक करू द्या. मला असं कधी कधी वाटतं मी काय करू शकते त्यांच्यासाठी मी फक्त त्यांना विनंती करते की, इमारतीच्या आवारात आल्यावर किंवा मुलं खेळत असताना फोटो काढू नका.”

अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केले की, “ती पॅपराझींसाठी किती वेळा हसुन पोज देते, ज्याचे सैफला देखील आश्चर्य वाटते.” अभिनेत्री म्हणाली, ‘सैफ म्हणतो, ‘तू नेहमी पोज का देत राहते.’ आणि मला वाटतं हो! मी अशीच आहे. सैफ विचारतो, ‘तू पोज का देत आहेस?’ आणि मी म्हणते, ‘चिल, हे मी आहे आणि मला ते आवडते.”

जेव्हा पॅपराझींना सैफ अली खानने टोमणे मारले, तेव्हा करीनाने त्यांचा बचाव केला आणि सांगितले की, “खरं तर, ते आमच्या गेटमधून सुरक्षा रक्षकाच्या समाेरून खाजगी मालमत्तेत घुसले आणि सर्व काही कॅप्चर करण्यास सुरुवात केली. आमच्यावर 20 कॅमेरे लावले जणू काही ते त्यांच्या हक्काचे आहे. मुळातच हे चुकीचे वर्तन आहे आणि प्रत्येकाने मर्यादेत राहणे आवश्यक आहे.” असे करीनाचे म्हणणे हाेतेय.

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सुजॉय घोषच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित थ्रिलर चित्रपटातून ती दिसणार आहे. त्याबरोबरच करीना हंसल मेहता यांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या थ्रिलर चित्रपटात देखील दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(bollywood actor saif ali khan angry for posing for paparazzi on kareena kapoor)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय

‘या’ प्रसिद्ध डीजे आणि गायकाची आत्महत्या, लव लाइफमध्ये आलेल्या तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल?

हे देखील वाचा