Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ‘तुझ्या सुंदरतेला तोडच नाही…’, म्हणत हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसणाऱ्या अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

‘तुझ्या सुंदरतेला तोडच नाही…’, म्हणत हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसणाऱ्या अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. यामध्ये ‘लकी: नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱी अभिनेत्री स्नेहा उल्लालचाही समावेश होतो. असे असले तरीही ती सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रिय असते. सध्या स्नेहा चर्चेत आहे. यामागील कारण आहे तिचे ब्रायडल फोटोशूट. स्नेहाने शेअर केलेले हे फोटोशूट वेगाने व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे, तर नेटकरी तिला हुबेहूब ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसत असल्याचे म्हणत आहेत.

स्नेहाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ब्रायडल फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने हार्ट ईमोजी आणि आपल्या नावाचे हॅशटॅग कॅप्शनमध्ये समाविष्ट केले आहे. तिचा हा लूक जवळपास ऐश्वर्या आणि ऋतिक रोशनच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटाशी मिळता जुळता आहे. या ब्लॅक एँड व्हाईट फोटोमध्ये स्नेहा कानातले फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोबतच कपाळावर टिकली आणि राजस्थानी बोरला तिच्या लूकमध्ये मोलाची भर घालत आहे.

स्नेहाच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “तू एकदम जोधा दिसत आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तुझ्या सुंदरतेला तोडच नाही. तू ऐश्वर्याच्या जुन्या लूकची आठवण करून दिलीस.”

खरं तर स्नेहाने सन २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘लकी: नो टाईम फॉर लव्ह’मधून बॉलिवूड पदार्पण केले होते. यामध्ये तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. यावेळी तिची तुलना ऐश्वर्यासोबत केली होती. असेही म्हटले गेले होते की, ऐश्वर्यासोबत ब्रेकअपनंतर सलमान तिच्याप्रमाणेच दिसणाऱ्या मुलीला लाँच करत आहे.

प्रेक्षकांनी जेव्हा स्नेहाला पहिल्यांदा पडद्यावर पाहिले, तेव्हा त्यांनाही असे वाटले की, ही ऐश्वर्याच आहे. मात्र, पहिल्या चित्रपटानंतर ती जास्त चित्रपटात दिसली नाही. यानंतर तिने ‘आर्यन’ (२००६), ‘क्लिक’ (२०१०) यांसारख्या चित्रपटात काम केले.

बॉलिवूडमध्ये अपयश आल्यानंतर तिने तेलुगु चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला होता. इथे तिने यशाची चव चाखली. सन २०१५ मध्ये तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. मागील वर्षी वेब सीरिज ‘एक्सपायरी डेट’मधून तिने पुनरागमन केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा