बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात, पण आज आपण ज्या फोटोबद्दल बोलत आहोत तो एक बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता आहे. जेव्हा हा फोटो सोशल मीडियावर समोर आला तेव्हा अनेक युजर्सने एकमेकांना हा फाेटाे ओळखण्याचे चॅलेंज केले. काेण आहे हा अभिनेता? जाे आज बाॅलिवूडवर राज्य करताे. चला तर मग जाणून घेऊया…
या निरागस मुलाचा फोटो पाहून तुम्ही विचार करत असाल की, हा कोणत्या स्टारचा बालपणीचा फोटो आहे. पण मंडळी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या लहान दिसणाऱ्या मुलाचे चित्रपट 200 आणि 300 कोटींच्या क्लबमध्ये अनेक वेळा सामील झाले आहेत.
अजूनही समजले नाही, तर थोडे सोपे करूया. हा मेगास्टार इंडस्ट्रीत ‘भाईजान’ म्हणून ओळखला जातो. होय, हा फोटो इतर कोणाचा नसून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आहे. सलमान खान (salman khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. हा फोटो त्याने स्वतः त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

फोटो शेअर करताना भाईजानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा फोटो मी 6 महिन्यांचा असताना काढला आहे.” फोटोमध्ये सलमान खान खूपच क्यूट दिसत आहे.
View this post on Instagram
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता लवकरचच दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, चाहते त्याच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानचा एप्रिलमध्ये ‘किसी का भाई किसी का जान’ हा चित्रपट रिलीज हाेणार आहे, तर दुसरा ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नेहमीप्रमाणे भाईजान त्यांच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा चाहत्यांना आहे.( bollywood actor salman khan childhood rare unseen photo unmissable went viral see stunning pic )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना पाहून रितेश अन् जेनेलियाच्या मुलांनी केले ‘हे’ कृत्य, व्हिडिओ पाहून युजर्स थक्क
सेल्फीच्या नावाखाली यामी गौतमच्या फॅनने काढला होता तिचा ‘तो’ व्हिडिओ, स्वतः सांगितला अनुभव