Wednesday, July 3, 2024

सलमानची बहीण अर्पिता पती आयुषसोबत दिसली ‘या’ लूकमध्ये, सोशल मीडियावर लोकांनी केल्या ‘अशा’ कमेंट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान, भलेही अभिनयापासून दूर असेल, पण तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अर्पिता बर्‍याचदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये स्पॉट केली जाते. काही दिवसांपूर्वी अर्पिताने तिच्या घरी ईद पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अर्पिताच्या घरी बॉलिवूडचे सर्व स्टार्स सहभागी झाले होते. दरम्यान, आता अर्पिताचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अर्पिता पती आयुष शर्मासोबत दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अर्पिता खान शर्माने (arpita khan sharma) लाल आणि गुलाबी फ्लोरल प्रिंटचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे. यादरम्यान ती विना मेकअपमध्ये खूप छान दिसत आहे. त्याचवेळी आयुष शर्माने पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह टी-शर्ट आणि रिप्ड जीन्स परिधान केला आहे. अशात दोघांनी पॅपराझींसाठी एकत्र पोजही दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर युजर्स कमेंट करून  वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अर्पिता आणि आयुषची जोडी अनेकांना आवडते. मात्र, अनेकजण त्यांना पुन्हा ट्रोल करताना देखील दिसत आहेत.

अर्पिता खान शर्माने 2014मध्ये आयुष शर्माशी लग्न केले होते. हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यावेळी अर्पिता आणि आयुष चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. त्याचवेळी, लग्नाच्या काही वर्षानंतर आयुषने 2018 मध्ये ‘लवयात्री’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. (bollywood actor salman khan sister arpita khan sharma and aayush sharma video goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’

अदा शर्माने केला शिवतांडव पाठ; लोक म्हणाले, ‘कंगना नंतर बॉलिवूडची दुसरी…’

हे देखील वाचा