बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला युएईचा ‘गोल्डन व्हिसा’ मिळाला आहे. याची माहिती त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत दिली आहे. या फोटोत त्याच्यासोबत युएईचे डायरेक्टर जनरल मोहम्मद अहमद अल मर्रीही दिसत आहेत. त्यांनीच संजय दत्तला हा सन्मान दिला आहे. यासोबतच अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये युएई सरकारचे आभारही मानले आहेत.
सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद
संजय दत्तने फोटो पोस्ट करत लिहिले की, “मेजर जनरल मोहम्मद अल मर्री यांच्या उपस्थितीत संयुक्त अरब अमिरातीचा ‘गोल्डन व्हिसा’ स्वीकारण्याचा सन्मान मिळाला. यासाठी युएई सरकारचे आभार. फ्लाई दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांच्या समर्थनासाठी मी त्यांचाही आभारी आहे.”
यासाठी महत्त्वपूर्ण आहे ‘गोल्डन व्हिसा’
प्रतिभावान व्यक्तींना युएईत स्थायिक होण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी हा व्हिसा दिला जातो. आता भारतातून गोल्डन व्हिसा मिळवणारा संजय दत्त हा पहिलाच अभिनेता आहे. संजय दत्त नेहमीच दुबईत ये- जा करत असतो. याव्यतिरिक्त त्याने यावर्षीची ईदही दुबईतच आपल्या कुटुंबासमवेत साजरी केली होती. अशामध्ये आता या व्हिसाने त्याला खूप फायदा मिळणार आहे.
युएईचा गोल्डन व्हिसा मे २०१९ मध्ये पंतप्रधान आणि दुबईच्या राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतर लागू करण्यात आला आहे. सन २०२० मध्ये युएई सरकारने या व्हिसाची सुरुवात केली होती. याचा कालावधी १० वर्षांसाठी असतो. यामध्ये विशेषत: पीएचडी धारक, कलाकार, डॉक्टर्स, इंजीनियअर्स आणि विद्यापीठांच्या निवडक पदवीधरांचा समावेश होतो.
Congratulations to His Royal Highness Sheikh @HamdanMohammed on welcoming the twins. I wish them all the love, luck and happiness in the world. https://t.co/2kMfwIlpk7
— Sanjay Dutt (@duttsanjay) May 24, 2021
दुबईच्या प्रिंसला वडील बनल्यानंतर दिल्या होत्या शुभेच्छा
नुकतेच दुबईचे प्रिंस शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हे जुळ्या मुलांचे वडील बनले आहेत. संजय दत्तने ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “जुळ्या मुलांच्या स्वागतासाठी शेख हमदान मोहम्मदला शुभेच्छा. मी त्यांच्यासाठी प्रेम, भाग्य आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-