Saturday, July 6, 2024

अनिल कपूरच्या पुतणीने केला ‘शकीरा’ गाण्यावर बेली डान्स; स्टेप्स आणि एनर्जी पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची मुले सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता संजय कपूरची मुलगी आणि अनिल कपूरची पुतणी शनाया कपूरचाही समावेश आहे. शनाया आपल्या बेली डान्स व्हिडिओमुळे चर्चेत असते. सध्या तिचा एक डान्स व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत ती जबरदस्त अंदाजात आपल्या बेली डान्स टिचरसोबत थिरकताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने हेही सांगितले की, तिने एकूण ६० सेकंदाच्या डान्सदरम्यान श्वासही घेतला नव्हता.

शनाया कपूरने हा व्हिडिओ ३ तासांपूर्वीच पोस्ट केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओत शनाया कपूर काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. ती या व्हिडिओत शकीरा गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिचे स्टेप्स आणि एनर्जी कमालीची आहे.

हा व्हिडिओ शेअर करत शनायाने लिहिले की, “तरीही, मी ६० सेकंदापर्यंत श्वास घेतला नाही. संजना मुथरेजासोबत ड्रम सोलो करणे नेहमीच सर्वोत्तम राहिले आहे.”

अनन्या पांडेची आई भावना पांडेनेही शनाया कपूरच्या या व्हिडिओवर इमोजीमार्फत कमेंट केली आहे.

खरं तर प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याची शनायाची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही तिचे बेली डान्सचे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले होते. शनाया कपूरचे इंस्टाग्राम अकाऊंट नुकतेच पब्लिक झाले आहे. असे असूनही तिला इंस्टाग्रामवर ३ लाखांपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.

शनाया कपूर काही दिवसांपूर्वी आपल्या लूक्स आणि स्टाईलमुळेही चर्चेत राहिली होती. अनन्या पांडेप्रमाणे शनायानेही पॅरिसमधील ले बाल डेस डेब्यूटेंट्स पॅरिसमध्ये पदार्पण केले होते. यासोबतच तिने आपली चुलत बहीण जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

लवकरच करू शकते बॉलिवूडमध्ये पदार्पण
शनायाचे कुटुंब बॉलिवूडशी संबंधित आहे. तिचे वडील संजय कपूर अभिनेता आहेत, मोठे काका अनिल कपूरदेखील प्रसिद्ध अभिनेता आहेत. याव्यतिरिक्त तिची चुलत भावंडे सोनम आणि अर्जुन हेदेखील बॉलिवूडमधील कलाकार आहेत. त्यामुळे शनायाचे स्टायलिश फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सनी लिओनीने वाढवला इंटरनेटचा पारा, बिकिनीमधील बोल्ड फोटो केला शेअर, चाहतेही झाले घायाळ
-क्या बात! २२ वर्षीय अनन्या पांडेने शेअर केलेल्या दोन फोटोंवर शाहरुखच्या पत्नीसह अनेकांच्या कमेंट्स, पाहा फोटो
-विकी जैनसोबत सुट्ट्या एन्जॉय करत असलेल्या अंकिता लोखंडेने पोस्ट केले ब्लॅक मोनोकिनीमधील मादक फोटो

हे देखील वाचा