Monday, July 1, 2024

‘माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली…,’ महिलेचा खळबळजनक दावा

बॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संपूर्ण चित्रपट सृष्टीत त्यांच्या निधानाने शोककळा पसरली आहे. मात्र त्यांच्या मृत्यू बाबत एका महिलेने  खळबळजनक दावा केला आहे. सानवी मालू असे या महिलेचे नाव आहे. सानवी ही दिल्ली राहणारे व्यापारी आणि कुबेर ग्रुपचे संचालक विकास मालू यांची दुसरी पत्नी आहे. सानवीने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिकची हत्या केल्याचं म्हटलं आहे. नेमका काय आहे हे प्रकरण?

सानवी ही दिल्ली राहणारे व्यापारी आणि कुबेर ग्रुपचे संचालक विकास मालू यांची दुसरी पत्नी आहे. सानवी यांनी त्यांच्या पतीला म्हणजेच विकास मालू यांना सतीश कौशिक यांनी 15 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप पत्रात केला आहे. सतीश यांनी पैसे परत मागितले, त्यासाठी ते एकदा विकासला दुबईत भेटायला गेले. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाले. विकासने सतीश यांना पैसे परत करण्याचे आश्वासनही दिले होते.

सानवी म्हणतात की, सतीश कौशिक (Actor Satish Kaushik) हे विकासच्या फार्महाऊसमध्ये आजारी पडले. यादरम्यान विकासने त्यांना 15 कोटी परत करावे लागू नयेत म्हणून विष पाजले असण्याची शक्यता आहे. सान्वीने गेल्या वर्षी पती विकास मालूवर बलात्काराचा आरोप केला होता.

तथापि, पोलिसांनी सतीश कौशिकच्या मृत्यूमध्ये कोणताही कट असण्याची शक्यता नाकारली आहे आणि त्यांच्या शवविच्छेदन अहवालात अभिनेत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर कौशिकच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतेही आरोप केलेले नाहीत.

दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी सतीश कौशिक ज्या फार्महाऊसमध्ये एका पार्टीत सहभागी झाले होते, तिथून काही औषधे जप्त केली आहेत. याच्या एका दिवसानंतर म्हणजेच ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सांगितले की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (bollywood-actor-satish-kaushik-death-latest-update-delhi-police)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान रॅपर कोस्टा टिच याचे निधन; मृत्यूच्या आधीचा व्हिडीओ व्हायरल
ब्रेकिंग! माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या काळजाच्या जवळ असलेल्या व्यक्तीचे निधन

हे देखील वाचा