बॉलीवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान याचे फॅन फॉलोइंग भारतातच नाही, तर परदेशातही पसरले आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशात शाहरुख खान देखील अनेकदा आपल्या चाहत्यांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्याशी प्रेमाने वागतो. अभिनेत्याच्या या वागणुकीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक देखील केले जाते. मात्र, यावेळी शाहरुख त्याच्या या शैलीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वागल्यामुळे चर्चेत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
शाहरुख खान (shah rukh khan) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि शाहरुख खान त्याला ढकलताना दिसला. शाहरुख, जो अनेकदा आपल्या चाहत्यांशी प्रेमाने वागण्यासाठी ओळखला जातो, त्याची ही शैली चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत जात असताना मुंबई विमानतळावर घडलेली ही घटना आहे.
View this post on Instagram
तर झाले असे की, किंग खान टर्मिनलमधून बाहेर पडत होता, तेव्हा त्याला चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते. या गर्दीतील एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत हाेता. अशात शाहरुखने फॅनला हाताने मागे ढकलून जवळ येण्यापासून रोखले. यावेळी, पॅपराझी त्याच्यावर ‘शाहरुख भाई’ आणि ‘खान साब’ असे ओरडत राहिले, परंतु अभिनेता काहीही उत्तर न देता त्याच्या गाडीकडे निघून गेला. लोकांना शाहरुखचे हे वागणे अजिबात आवडले नाही.
एका सोशल मीडिया युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सेलिब्रिटी आहे हा देव नाही.’, तर आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘शाहरुख खान, तू आमच्या चाहत्यांमुळे येथे आहेस हे विसरू नकोस, नाहीतर हाहाहाहा…’ अशाप्रकारे युजर्स अभिनेत्याल ट्राेल करत आहेत.(bollywood actor shah rukh khan stops fan from taking selfie pushes him away in impatience see viral video )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गुलाबी साडीमध्ये खुललं रकुल प्रीत सिंगचं साैंदर्य, फाेटाे व्हायरल
हम आपके हैं कौनच्या शूटिंग दरम्यान ‘या’ अभिनेत्रींच्या केसांना लागली होती आग, इतक्या वर्षांनी झाला मोठा खुलासा