Saturday, June 29, 2024

काय सांगता! शाहरुखला घ्यायचा नव्हता चार वर्षांचा ब्रेक; म्हणाला, ‘आजारामुळे मी…’

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘पठाण‘ चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. नुकतेच या चित्रपटाचे ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाले, ज्यावरून वाद चांगलाच वाढला आहे. मात्र, शाहरुख या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, शाहरुखने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने भाष्य केले. या संवादात त्याने त्याचा शेवटचा रिलीज झालेला ‘झिरो’ चित्रपट आणि त्याच्या चार वर्षांच्या ब्रेकबाबतही मोठा खुलासा केला.

शाहरुख खान (shah rukh khan) याने सांगितले की, “त्याने इतका मोठा ब्रेक घेण्याची योजना आखली नव्हती.” शाहरुख म्हणाला की, “त्याला फक्त एक वर्षाचा ब्रेक घ्यायचा होता, पण लॉकडाऊन आणि साथीच्या आजारामुळे तो लांबला. मात्र, यामुळेच त्याला तंदुरुस्त राहण्यासाठी, कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी अधिक वेळ मिळाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आपला मुद्दा पुढे करत शाहरुख ‘झिराे’ चित्रपटाविषयी बाेला. शाहरुख म्हणाला, “मी यासाठी खूप मेहनत घेतली, पण यश आले नाही. चित्रपट चालला नाही तेव्हा मला फार वाईट वाटले, पण नंतर वाटले की, आता लोकांना आवडेल तेच करेन. मी माझ्या मनाचे खूप ऐकले आहे. आता मला लोकांच्या आवडीनुसार काम करायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखचा चित्रपट ‘पठाण’ रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे. या चित्रपटात तो दमदार ऍक्शन करताना दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्याशिवाय जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांनीही काम केले आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय शाहरुख पुढच्या वर्षी ‘जवान’ आणि ‘डंकी’मध्येही दिसणार आहे. त्याच्या तीनही चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (bollywood actor shah rukh khan talks about zero movie failure and four year break)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोहित रैना अन् अदिती शर्माच्या वैवाहिक आयुष्याला लागणार पुर्णविराम? अभिनेत्याने इंस्टावरुन हटवले फोटो

केतकी माटेगावकर घेऊन येतीये चाहत्यांसाठी सरप्राइझ, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा