Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड सुहानाच्या ग्लॅमरस फोटोवर शाहरुखच्या कमेंटने लुटली लाइमलाइट, एकदा पाहाच फाेटाे

सुहानाच्या ग्लॅमरस फोटोवर शाहरुखच्या कमेंटने लुटली लाइमलाइट, एकदा पाहाच फाेटाे

बॉलीवूडचा बादशाह म्हटला जाणारा शाहरुख खान त्याच्या बुद्धिमत्तेसाठीही खूप प्रसिद्ध आहे. आपल्या विनोदी उत्तरांनी लोकांना हसवायला तो कधीच विसरत नाही. मग तो त्यांला विचारलेला प्रश्न असो किंवा सुहाना आणि आर्यन खानने पोस्ट केलेल्या कोणत्याही फोटोवर केलेली कमेंट असो.

शाहरुख खान (shah rukh khan) जगासाठी सुपरस्टार असला तरी तो आपल्या मुलांची काळजी घेणारा एक चांगला बाबा आहे. अशातच किंग खानने त्याच्या विनाेदी आणि मजेदार स्टाईल कमेंट्स करून सगळ्याचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच अभिनेत्याने लेक सुहानाच्या फाेटाेवर काॅमेडी कमेंट करत सर्वांनाचा पाेटधरुन हसायला भाग पाडले आहे.

सुहाना खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधला तिचा ग्लॅमरस आणि क्लासी लूक चाहत्याना चांगलाच आवडला आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स देखील केल्या, पण शाहरुख खानच्या कमेंटने सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं.

सुहानाने तीन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तिने बॅकलेस गाऊन घातला आहे. दुसऱ्या फाेटाेत गौरी खान शनाया कपूरसोबत उभी आहे. तर तिसर्‍या फोटोत सुहानाने शॉट पिंक रंगाचा ड्रेस घातला असून ती बोल्ड पोज देताना दिसत आहे.

या सर्व फाेटाेंपेक्षा युजर्सचे लक्ष शाहरुख खानच्या कमेंटकडे गेले. त्याने पोस्टवर कमेंट करत लिहिले की, ‘तू खूप सुंदर दिसत आहेस… दिवसभर पायजमा घालून घरात फिरते त्यापेक्षा हा लूक किती वेगळा आहे.’ शाहरुखच्या कमेंटला 1700 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सुहाना खानच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी तिचा डेब्यू सिनेमा ‘द आर्चीज’ नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्याच वेळी, 26 जानेवारी रोजी शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पठाण’ चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.(bollywood actor shah rukh khan witty reply to suhana khan photos catches all attention)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हनीमूनबाबत फॅनने शाहरुखला विचारला हा अजब प्रश्न, किंग खानच्या उत्तराने चाहत्याची बोलतीच बंद

शाहरुखचा जुना फोटो पोस्ट करून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पाहा कसे दिले अभिनेत्याने चोख प्रत्युत्तर

हे देखील वाचा