Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘विवाह’ला १५ वर्षे पूर्ण; अमृता रावने शाहिद कपूरबाबत केला चकित करणारा खुलासा

‘विवाह’ला १५ वर्षे पूर्ण; अमृता रावने शाहिद कपूरबाबत केला चकित करणारा खुलासा

‘विवाह’ हा बॉलिवूडमधील असा एक चित्रपट आहे जो शंभर वेळा पाहिला, तरी कोणाला कंटाळा येत नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या हे होते. त्यांनी साखरपुडा ते लग्न असा एक प्रवास सुंदर पद्धतीने या चित्रपटात दाखवला होता. या चित्रपटात शाहिद कपूर आणि अमृता राव हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट १० नोव्हेंबर २००६ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अरेंज मॅरेज दाखवले होते. एका मुलीला बघायला जाण्यापासून ते लग्नाच्या सगळ्या रीती या चित्रपटात दाखवल्या होत्या. चित्रपटातील शाहिद आणि अमृताची जोडी सगळ्यांना खूप आवडली होती. त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकांनी त्यांच्याबाबत मत केले होते की, अमृता आणि शाहिद रिलेशनमध्ये आहेत.

विवाह चित्रपटात ‘मुझे हक है’ या गाण्यात शाहिद आणि अमृताची केमिस्ट्री पाहून लोकांनी त्यांच्याबाबत चर्चा चालू केली होती. अमृताच्या सिंपल आणि सुंदर लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या दोघांची जोडी सगळ्यांना खूप आवडली होती. परंतु त्यावेळी शाहिद आणि करीना कपूर रिलेशनमध्ये होते, तरी देखील शाहिद आणि अमृता यांच्यात काही तरी चालू आहे अशी सर्वत्र चर्चा चालू झाली. यावर अमृता आणि शाहिदने त्यांची कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अनेक वर्षापासून चाललेल्या या चर्चांवर अमृताने तिचे मत व्यक्त केले आहे. (Bollywood actor Shahid Kapoor and amrita rao starrer vivah turn 15 years, know some interesting story)

https://www.instagram.com/p/CWFHkN3vplg/?utm_source=ig_web_copy_link

मागच्या वर्षी एका मुलाखतीत अमृता रावने शाहिद कपूरसोबत जोडलेल्या तिच्या नावाबाबत खुलास केला. अमृताने सांगितले की, “त्यावेळी आम्ही मित्र देखील नव्हतो. तो केवळ माझा सह-कलाकार होता. आमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल केवळ आदर होता. जेव्हा मी त्याच्यासोबत काम करत होते, तेव्हा तो आधीच रिलेशनमध्ये होता. त्यावेळी प्रेक्षकांना असे वाटते होते की, आम्ही वैयक्तिक आयुष्यात देखील कपल असावे. त्याचे कारण देखील असे होते की, आमची ऑनस्क्रिन केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली होती. आम्ही असे मित्र देखील नव्हतो की, आम्ही कधी एकत्र फिरत होतो.”

तिने पुढे सांगितले की, “शाहिद कपूरने एकदा सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले होते की, त्याला माझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. परंतु माहित नाही का पण ‘विवाह’नंतर त्याच्यासोबत मला परत कधीच कास्ट केले गेले नाही.”

या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचे अनेक मीम देखील बनवले होते. या चित्रपटात अमृता शाहिद कपूरसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते की, “पाणी घे तू खूप दमला असशील.” या डायलॉगवर सोशल मीडियावर खूप मीम्स तयार झाले होते. या चित्रपटात अनुपम. खेर, आलोकनाथ, समीर सोनी, सीमा बिस्वास यांसारखे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा