बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, जेव्हा तो पहिल्यांदा मुंबईला येत होता, तेव्हा शाहरुखला माहीत नव्हते की, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी ट्रेन बोरिवलीला पोहोचल्यानंतर ती लोकल ट्रेन बनते. जो कोणी शाहरुखच्या सीटवर बसेल, त्याला तो ही आमची सीट आहे, आम्ही तिकीट काढले आहे, असे म्हणत असे. शाहरुख त्याच्या मित्रांसोबत असायचा, म्हणूनच बहुतेक लोक त्याच्याशी वाद न घालता सीट सोडत असत.
एके दिवशी घडले असे की, एक महिला तिच्या पतीसोबत शाहरुखच्या जागेवर आली होती. पण, त्या महिलेचा आदर करत, शाहरुखने त्या महिलेला त्याची सीट दिली. मात्र तिच्या पतीला नाही दिली. यामुळे त्या बाईला इतका राग आला की, तिने शाहरुख खानला कानाखाली मारली आणि म्हणाली, “ही सर्वांची ट्रेन आहे, कोणी कोठेही बसू शकतो. आला मोठा आरक्षणवाला.”
काही वेळ शाहरुख खानला समजलेच नाही, की त्याच्यासोबत काय घडले आहे. यानंतर, तो जाऊन एका जागेवर शांत बसला आणि विचार करू लागला की, मुंबईने त्याचे काय मस्त स्वागत केले आहे.
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले, गेल्या ४ वर्षांपासून दिग्दर्शक भन्साळी ‘इजहार’ नावाचा एक रोमँटिक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या चित्रपटात शाहरुख खानला कास्ट करायचे आहे. ही एक प्रेमकथा असेल, ज्यात शाहरुख एका भारतीय तरुणाची भूमिका साकारणार आहे, जो नॉर्वेमधील मुलीच्या प्रेमात पडतो. काही वृत्तानुसार, हा चित्रपट खऱ्या प्रेमकथेवर आधारित असेल. या चित्रपटाचा रोमांच असा आहे की, तो तरुण आपले प्रेम मिळवण्यासाठी, चक्क सायकलवरून नॉर्वेला जातो.










