Saturday, July 6, 2024

ब्रेकिंग! ‘टू स्टेट’ चित्रपटातील प्रमुख अभिनेत्याचे दुःखद निधन, मुंबई घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन क्षेत्रातून अनेक दुःखद घटना समोर येत असतात. अशातच बॉलिवूडला आणखी एका दुःखाने घेरले आहे. ‘टू स्टेट्स’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारणारे अभिनेते आणि पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे रविवारी (१० एप्रिल) रोजी रात्री उशिरा मुंबईत शेवटचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू कशाने झाला हे अजूनही स्पष्ट झाले नाही. ही बातमी ऐकून त्यांचा चाहत्यांना तसेच चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना खूप दुःख झाले आहे. सोमवारी (११ एप्रिल) त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले होणार आहेत.

शिवसुब्रमण्यम यांच्या निधनाची वार्ता चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी दिली.हाती आलेल्या माहितीनुसार त्यांचे अंत्यसंस्कार आज ११ वाजता मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत होणार आहेत.

त्यांच्या निधनावर अनेकजण शोक व्यक्त करत आहे. त्याचे चाहते तसेच अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. चित्रपट निर्मात्या बिना सरवर यांनी देखील सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या गोष्टीची देखील खुलासा केला की, दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा जहानचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला होता. त्यांनी लिहिले, “खूप दु:खद बातमी. मुलगा जहांनच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा जहान याला ब्रेन ट्युमर झाला होता. १६ व्या वाढदिवसापूर्वी त्याचे निधन झाले.”

शिव सुब्रमण्यम यांनी अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी ‘तीन पत्ती’, ‘प्रहार’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी राणी मुखर्जीसोबत ‘हिचकी’ या चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांच्या आणि मालिकांच्या कथा देखील लिहिल्या आहेत. त्यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या ‘परिंदा’ आणि सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारो ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटांची पटकथा लिहिली आहे. ‘हजारो ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटाच्या पटकथेची त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे. याशिवाय ‘परिंदा’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा