Saturday, June 29, 2024

सिद्धार्थ अन् कियारा मुंबई विमानतळावर झाले स्पाॅट, पॅपराझींना वाटली मिठाई

बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. अशातच आता हे नवविवाहित जोडपे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहे. जिथे दोघांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यादरम्यान सिड-कियाराने पॅपराझींना मिठाईचे वाटपही केले.

कियारा अडवाणी (kiara advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) ​​यांनी कुटुंबासाठी छोटेसे रिसेप्शनचे नियोजन केले होते. रिसेप्शननंतर आता हे कपल मुंबईला पोहोचले आहे, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये कियाराने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सूट घातला असून ती यामध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. यादरम्यान कियाराने मांगमध्ये सिंदूरही भरले आहे, जो तिला पूर्णपणे नवीन वधूचा लूक देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जुन्या वर्क कमिटमेंटमुळे पुढे ढकलला हनिमूनचा प्लॅन
माध्यमातील वृत्तांनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी त्यांचा हनिमूनचा प्लॅन सध्यातरी पुढे ढकलला आहे. हनिमून प्लॅन पुढे ढकलण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची जुनी वर्क कमिटमेंट असल्याचे सांगितले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमधून सिद्धार्थ करणार ओटीटीवर पदार्पण
कियारा अडवाणी लवकरच साऊथ स्टार राम चरणसोबत ‘RC-15’ चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंग जोरात सुरू आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ दिशा पटानीसोबत ‘योद्धा’ चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तो ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पणाची तयारी करत आहे.(bollywood actor siddharth and kiara were seen holding hands at mumbai airport distributed sweets to paparazzi)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दलजीत कौरने केले एक्स पती शालीन भनाेतला विजयी करण्याचे आवाहन; म्हणाली, ‘अनेक महिने कुटुंबापासून…’

‘माझी माफी…’, सुकेश चंद्रशेखरने चाहत खन्नाला पाठवली 100 कोटींची कायदेशीर नोटीस

हे देखील वाचा