Saturday, June 29, 2024

‘शेरशाह’साठी कियाराने आकारले ‘इतके’ कोटी रुपये; तर सिद्धार्थनेही घेतले अभिनेत्रीच्या दुप्पट मानधन

बॉलिवूडमध्ये साकारण्यात येत असलेल्या अनेक कथा या सत्य घटनेवरही आधारित असतात. सत्य घटनेवर आधारित एखादे पात्र साकारताना ते हुबेहूब तसेच होणे फार गरजेचे असते. यासाठी कलाकारांना भरपूर अभ्यास करावा लागतो. त्यांना त्या पात्रांविषयी संपूर्ण माहिती ज्ञात करावी लागते. अशा भूमिका साकारताना कलाकारांना जास्त मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे ते यासाठी मोठे मानधन घेतात.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १२ ऑगस्ट रोजी ‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत यशाचे मोठे शिखर गाठले आहे. यासाठी चित्रपटातील सर्व कलाकारांनी मेहनत घेतली होती. ‘शेरशाह’ चित्रपटाने गाठलेल्या यशाच्या शिखरामध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाचा मोठा वाटा होता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांनी या अभिनेत्याला चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. (Bollywood actor Sidharth Malhotra and actress Kiara Advani got so much fee for Shershaah)

‘कॅप्टन विक्रम बत्रा’ यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट करण्यासाठी सिद्धार्थने ७ कोटी कोटी इतके मानधन घेतले आहे, तर कियारा आडवाणीने सिद्धार्थपेक्षा निम्मे ४ कोटी मानधन घेतले आहे. चित्रपटामध्ये अजय सिंग राठोडची भूमिका साकारणाऱ्या निकितिन धीरला ३५ लाख एवढे मानधन मिळाले आहे. तसेच जीएल बत्राच्या भूमिकेत असलेल्या पवन कल्याणला ५० लाख रुपये मानधन दिले आहे, तर शिवपंडितने ४५ लाख रुपये मानधन घेतले आहे.

या चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगमध्ये समीक्षकांकडून ८.९ रेटिंग मिळाले आहे. आयएमडीबीमध्ये ‘शेरशाह’ला सर्वात जास्त रेटिंग मिळाले आहेत. एवढे रेटिंग मिळवणारा हिंदी चित्रपटातील हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटातील सर्वच कलाकार फार आनंदी आहेत.

अभिनय क्षेत्रामध्ये ज्या अभिनेत्याचा अथवा अभिनेत्रीचा अभिनय जितका दमदार असतो, तितके जास्त मानधन ते घेतात. या चित्रपटामध्ये कियारा आडवाणीने सुद्धा डिंपल चीमा यांची भूमिका छान साकारली. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांच्या भूमिकेला समीक्षकांनी देखील कौतुकाची थाप दिली आहे. सिद्धार्थने पुन्हा एकदा ट्वीट करत असे म्हटले आहे की, “या दुनियेमध्ये मी आज स्वतःला सर्वात वरच्या स्थरावर अनुभवत आहे. खरंच… असं सगळं करण्यासाठी सर्वांचे धन्यवाद. मी हे आभार त्या सर्वांचे मानत आहे, जे मला आणि ‘शेरशाह’ला एवढे प्रेम देत आहेत. या सर्व आठवणी माझ्यासाठी कायमच चांगल्या आणि स्मरणीय असतील.”

कलाकारांनी संपादन केलेल्या यशामुळे पूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. या चित्रपटाच्या यशासाठी संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत सार्थकी लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

हे देखील वाचा