Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लगीन घाई! सिद्धार्थची वधू कियारा अडवाणी जैसलमेरसाठी रवाना, विमानतळावर झाली स्पाॅट

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि लाेकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. हे जोडपे 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार असून आजपासून त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन्सही सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत, सिद्धार्थची नवरी कियारा अडवाणी जैसलमेरला रवाना झाली आहे, कियारा विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान अभिनेत्रीने मीडियासमोर हसत हसत पोज दिली.

अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) शनिवारी (दि. 04 फेब्रुवारी)ला सकाळी कलिनाच्या खासगी विमानतळावर दिसली. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि गुलाबी शाल परिधान केली हाेती. कारमधून खाली उतरल्यानंतर कियाराने काही लोकांना मिठी मारली आणि नंतर पॅपराझींकडे हसत पोज दिली. मात्र, यावेळी सिद्धार्थ कियारासोबत नव्हता.

कियारा अन् सिद्धार्थच्या लग्नात प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता
सिद्धार्थ आणि कियारा जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. पॅलेसच्या सोशल मीडिया अकाऊंटने एका पॅपराझींच्या पाेस्टवर कमेंट करत गुरुवारी लग्नाच्या ठिकाणाची पुष्टी केली. या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त, शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत, करण जोहर आणि मनीष मल्होत्रा ​​यांच्यासह सुमारे 100 पाहुणे लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

आज आहे कियाराचा मेहंदी समारंभ
याशिवाय लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या दोन रिसेप्शनच्याही बातम्या आहेत. एक रिसेप्शन दिल्लीत तर दुसरे मुंबईत होणार असल्याचे बोलले जात आहे. हे जोडपे लग्नाच्या दिवशीच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतील. त्याचबरोबर आजपासून लग्नाची सर्व कार्ये सुरू होणार आहेत. प्रथम आज म्हणजेच शनिवारी (दि. 04 फेब्रुवारी)ला मेहंदी सोहळा होईल आणि त्यानंतर संध्याकाळी संगीत होईल.( bollywood actor sidharth malhotra kiara advani wedding actress leaves for jaisalmer spotted at the airport )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
देखो पर प्यारसे! नॅशनल क्रश प्रिया वॉरियरच्या अदांनी चाहते घायाळ
शालिन भनोटची एक्स पत्नी दलजीत कौर पुन्हा एकदा प्रेमात, ‘या’ व्यक्तीसोबत थाटणार संसार

हे देखील वाचा