Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड सोनू सूदसोबत सेल्फी काढायला कोणाला आवडणार नाही ! विमानतळावरील हवाईसुंदरीही निघाली अभिनेत्याची चाहती

सोनू सूदसोबत सेल्फी काढायला कोणाला आवडणार नाही ! विमानतळावरील हवाईसुंदरीही निघाली अभिनेत्याची चाहती

काही दिवसांपूर्वी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. कोरोना काळात सर्वांसाठी अगदी देवासारखा धावून येणारा सोनू स्वतः या आजाराला बळी पडल्याचे समजताच, त्याचे चाहते खूपच अस्वस्थ झाले होते. मात्र अभिनेता काही दिवसांतच या आजारातून सावरला आणि नुकतेच त्याला विमानतळावर स्पॉट केले गेले आहे. त्याचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोविड -१९ मधून बरे झाल्यानंतर, सोनू सूद मुंबई विमानतळावरुन कुठेतरी जाताना दिसला. यावेळी त्याने निळ्या रंगाची जीन्स आणि गुलाबी शर्ट परिधान केलेले पाहायला मिळाले. अभिनयामुळे तर तो आवडता होताच, मात्र आता त्याची कामगिरी पाहता, सोनू सर्वांचाच चहिता झाला आहे. तो दिसताच सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू होते. तर मग विमानतळावरील हवाईसुंदरी कशी काय मागे राहू शकते!

समोर आलेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये विमानतळावरील एक हवाईसुंदरी सोनू सूदसोबत सेल्फी काढताना दिसली. प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अभिनेता विमानतळावर पोहचतात हवाईसुंदरी त्याच्या जवळ आली. तिने सोनूकडे सेल्फीसाठी विनंती केली. सोनूनेही आपल्या या चाहतीचे मन न मोडता तिच्यासोबत सेल्फी क्लीक केली.

सोनूने बॉलिवूडच्या ‘जोधा अकबर’, ‘सिंग इज किंग’, ‘दबंग’, ‘सिम्बा’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘एन्टरटेन्मेंट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर हा अभिनेता तेलगू चित्रपट ‘आचार्य’मध्ये आणि ‘पृथ्वीराज’ या हिंदी चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ‘थामिलरसन’ या तमिळ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हे देखील वाचा