Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड अचंबित! टायगर श्रॉफने खतरनाक स्टंट करत मारली पाण्यात उडी, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

अचंबित! टायगर श्रॉफने खतरनाक स्टंट करत मारली पाण्यात उडी, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासोबतच स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. त्याने त्याच्या अभिनयासोबत त्याच्या डान्सने आणि स्टंटने सर्वत्र आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. या सोबतच टायगर त्याच्या फिटनेसची देखील खूप काळजी घेत असतो. त्याचा फिटनेस बघून त्याचे चाहते नेहमीच त्याचे कौतुक करत असतात. तो नेहमीच त्याचे जिममध्ये व्यायाम करताना आणि स्टंट करताना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता देखील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने बघितला जात आहे.

टायगर श्रॉफने शेअर केलेला हा व्हिडिओ मालदीवमधील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कसा तो स्टंट करत पाण्यात उडी मारतो. त्याचा हा व्हिडिओ बघून चाहते या व्हिडिओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाहीत. केवळ चाहतेच नाही, तर अनेक कालाकरांनी देखील त्याच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा तो दिशा पटानी सोबत सुट्ट्यांचा आनंद घ्यायला मालदीवला गेला होता. व्हिडिओमधील त्याची बॉडी बघून चाहते त्याच्या फिटनेसचे पुन्हा एकदा दिवाने झाले आहे. आता सगळेजण त्याच्या आणि दिशाच्या मालदीवमधील एकत्र फोटोची उत्सुकतेने वाट बघत आहेत. टायगर आणि दिशा शनिवारी मुंबई विमान तळावर मालदीववरून येताना स्पॉट झाले होते.

टायगर श्रॉफच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, तो लवकरच त्याच्या ‘गणपती’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन दिसणार आहे. क्रिती आणि टायगर हे दोघे या आधी ‘हिरोपंती’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. टायगर श्रॉफने त्याच्या ‘हिरोपंती 2’ या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत तारा सुतारिया दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आहे ‘द कपिल शर्मा शो’ची खूप मोठी फॅन, म्हणाली…

-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांसाठी दिला खास संदेश

-धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर

हे देखील वाचा