बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी कॅटरिना कैफ यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येणार आहे. 9 डिसेंबरला या दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आतापासूनच सोशल मीडियावर विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या या खास दिवसाची चर्चा सुरू झाली आहे. विकी आणि कॅटरिना त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस कसा साजरा करतील हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. या सगळ्या दरम्यान, विकी कॅटरिनाला कोणते सरप्राईज देणार आहे? यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (katrina kaif ) त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक भव्य पार्टी देणार आहेत. विकी कौशलच्या सरप्राईजबद्दल चाहतेही उत्सुक आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, विकी आणि कॅटरिना कैफने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशनसाठी डेस्टिनेशन रोमँटिक ट्रिपची योजना आखली आहे जिथे दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतील.
माध्यमातील वृत्तानुसार, विकी कौशल आणि कॅटरिना कैफ मालदीवमध्ये फर्स्ट ऍनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहेत. मात्र, तुम्हाला माहित आहे का? कॅटरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या हनीमूनसाठी मालदीवलाच गेले होते, तिथून आल्यानंतर दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले. अशातच आता पहिल्या वाढदिवसानिमित्त ते दोघेही आपल्या कुटुंबियांसोबत एक छोटीशी पूजा करणार असून विकीची आई वीणा कौशल यांनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी कुटुंबाच्या पुजाऱ्याला बोलावले आहे.
कॅटरिना कॅफच्या वर्कफ्रंट बोलचे झाले, तर कॅटरिनाचा ‘फोन भूत’ हा चित्रपत नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय कॅटरिना ‘टायगर 3’ आणि ‘जी ले जरा’मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’, ‘धुनकी’,’गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (bollywood actor vicky kaushal and katrina kaif will celebrate there first marriage anniversary at maldevi)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ठरलं रे! कियार अन् सिद्धार्थ 2 डिसेंबरला अडकणार लग्न बंधनात?
महाभारत फेम अभिनेता पुनीत इस्सर यांचे ईमेल आयडी हॅक, तब्बल 13 लाखांना लागला असता चुना