बाॅलिवूड कलाकार चित्रपटांमुळे तर चर्चेत असतातच पण त्याहून जास्त चर्चा होते ती त्यांच्या खासगी आयुष्याची. आज आपण एका अशा अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो उत्कृष्ट चित्रपटांसोबतच त्यांच्या चार लग्नांमुळेही चर्चेत होता. विनोद मेहरा असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. एकेकाळी इंडस्ट्रीतील सर्वात तेजस्वी अभिनेता म्हणून ओळख असलेल्या विनोद मेहरा यांचा आज म्हणजेच साेमवार (दि. 13 फेब्रुवारी)ला वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1945 साली लाहोरमध्ये झाला. त्यांनी जवळपास 3 दशके बॉलिवूडवर राज्य केले आणि जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतेक चित्रपट हिट ठरले. त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. त्यांनी त्यांच्या काळात अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले. परंतु त्यांचे नावही अनेकांशी जोडले गेले. मात्र, त्यांचे प्रेम जीवन नेहमीच चढ-उतारांनी भरलेले होते. चला तर मग विनोद मेहरा यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणुन घेऊ या…
विनोद मेहरा (Vinod mehara) यांनी रेखासोबत बहुतेक चित्रपटांमध्ये काम केले. एकत्र काम करतांना त्यांच्यातील जवळीक वाढली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. तो तिला पत्नीचा दर्जा देऊ शकला नाही. ना रेखा (Rekha) ना विनोद मेहरा… दोघांनीही त्यांच्या लग्नाची घोषणा केली नाही. सर्वत्र त्यांच्या प्रेमाच्या चर्चा होत असल्या तरी दोघांच्या नशिबात प्रेम नव्हते. त्यांच्या या सर्व अवस्थेसाठी त्यांनी पत्नीला जबाबदार धरण्यास सुरुवात केली. म्हणुन त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि ते दोघे विभत्त झाले. त्यानंतर विनोद हे सहकलाकार बिंदिया गोस्वामी तिच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मग दोघांनीही गुपचुप लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी येताच दुसऱ्या पत्नीने विनोद मेहरा यांना धमक्या देण्यास सुरुवात केली.
रेखा-विनोद मेहराचं लग्न कसं पक्कं झालं?
लेखक यासिर उस्मान यांनी त्यांच्या ‘रेखा एन अनटोल्ड स्टोरी’ (Rekha An Untold Story) या पुस्तकात याचा उल्लेख करेपर्यंत दोघांचे लग्न निश्चित झाले नव्हते. त्यांनी आपल्या पुस्तकात सांगितले की, विनोद मेहरा यांनी कोलकाता येथे एका खाजगी कार्यक्रमात रेखाशी लग्न केले होते. पण, त्यांच्या आईने रेखाला सून म्हणून स्वीकारले नव्हते. अशा परिस्थितीत विनोद रेखाला घेऊन त्यांच्या घरी पोहोचताच त्याच्या आईने अभिनेत्रीवर आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
विनोद मेहरांच्या आईचा नकार
रेखाने (Rekha) विनोद यांच्या आईला शांत करण्याचा आणि त्यांच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच विनोद मेहराच्या आईने अभिनेत्रीला तिच्यापासून दूर ढकलले. इतकेच नाही तर विनोद मेहरा यांच्या आईने रेखावर चप्पल फेकून मारली. विनोद यांनी आईला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. अनेक प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न न झाल्याने त्यांनी रेखाला घर सोडण्यास सांगितले.
रेखा आणि विनोद मेहरा यांचे लग्न मोडले
यानंतर रेखा आणि विनोद मेहरा (Vinod mehara) यांचे लग्न मोडले आणि त्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी दुसरी मुलगी शोधण्यास सुरुवात केली. एकीकडे विनोद मेहराच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले, तर दुसरीकडे त्यांचे व्यावसायिक आयुष्य चांगले चालु होते. दरम्यान, त्यांच्या आईने त्यांचे एका मुलीशी लग्न लावून दिले. लग्नाला काही दिवस उलटले होते की विनोद मेहरा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
त्यांच्या या सर्व अवस्थेसाठी अभिनेत्याने पत्नीला जबाबदार धरण्यास सुरुवात केली. या सर्वांवरून बिंदिया गोस्वामी इतकी घाबरली होती की, ती एका हॉटेलमध्ये राहू लागली. अखेरीस, धमक्यांना कंटाळून बिंदियाने स्वतःला विनोदपासून दूर केले आणि नंतर जेपी दत्ताशी लग्न केले. बिंदियाच्या या हालचालीने विनोद अस्वस्थ झाला, पण तो त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे परत आला नाही. आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर, विनोद मेहरा यांनी 1988 मध्ये किरणशी लग्न केले आणि शेवटी विनोद मेहरा यांना आनंदी जीवन जगण्याची संधी मिळाली. पण, लग्नानंतर दोन वर्षांनी विनोद मेहरा यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
(bollywood actor vinod mehara and rekha affair love story wedding)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रीना रॉयसारखे दिसण्याच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाने पहिल्यांदाच तोडले मौन; म्हणाली, ‘मला वाटते…’
सिद्धार्थ – कियाराच्या रिसेप्शन पार्टीत ‘या’ सेलिब्रेटींनी लावली हजेरी