Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड विवेक ओबेरॉय बनला ‘देवमाणूस’, कोरोना रुग्णांच्या मदतीसह केलीय ‘ही’ लाख मोलाची कामगिरी

विवेक ओबेरॉय बनला ‘देवमाणूस’, कोरोना रुग्णांच्या मदतीसह केलीय ‘ही’ लाख मोलाची कामगिरी

देशात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने प्रत्येकजण त्याला शक्य होईल तशी सगळी मदत करत आहेत. यात बॉलिवूड मधील कलाकारांचे तर खूप मोठे योगदान आहे. या कठीण काळात अनेक कलाकार समोर येऊन मदत करत आहेत. याच यादीत आता अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या नावाचा समावेश झाला आहे. तो आधीपासून अनेक गरजू व्यक्तींना मदत करत आला आहे. अशातच त्याने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठीच्या निधीत आपले योगदान दिले आहे.

कोरोना रुग्णांसाठी आज प्रत्येकजण मदत करत आहेत. यातच विवेक ओबेरॉयने 25 लाख रुपयांची मदत केली आहे. नुकतेच ‘आयएम ऑक्सिजन मॅन’ साठीच्या एका कार्यक्रमात डॉक्टर विवेक बिंद्रा यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे की, विवेक ओबेरॉयने कोणालाही काहीच न सांगता 25 लाख रुपये जमा केले आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत सर्वांना योग्य सुविधा मिळण्यासाठी त्याने ही मदत केली आहे. त्याने दिल्लीमध्ये 200 लोकांचे बेड असणारे मोफत कोव्हिड सेंटर देखील उभारले आहे. तसेच त्याने 1000 पेक्षाही जास्त रुग्णांचा जीव वाचवला आहे.

डॉक्टर विवेक बिंद्रा यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन विवेक ओबेरॉय याला सुसज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना व्यतिरिक्त विवेक ओबेरॉयने शेकडो मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली आहे. तसेच 2.5 लाखांपेक्षाही जास्त लहान मुलांना कॅन्सर पासून वाचवले आहे. त्याने 2200 पेक्षाही जास्त मुलींना बाल वैश्यावृत्ती पासून वाचवले आहे. यातील 50 पेक्षी जास्त मुली आज परदेशात शिकत आहेत.

विवेक ओबेरॉयने त्याच्या पहिल्या ‘कंपनी’ या चित्रपटाची संपूर्ण कमाई एक मुलीच्या उपचारासाठी दान केली होती. त्याने एका मुलीच्या सर्जरीचा संपूर्ण खर्चही उचलला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा