बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमधून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेली काही वर्ष हिंदी सिनेसृष्टीपासून दुरावलेला विवेक पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासठी तयार झाला आहे. कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम अशा विविध चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर विवेकने आता मराठी सिनेसृष्टीत काम करायची इच्छा व्यक्त केली आहे.
विवेक ओबेरॉय याने बऱ्याचदा त्याचा जवळचा मित्र आणि अभिनेता रितेश देशमुखकडे याबद्दल विचारपूसही केली आहे. अभिनेता म्हणाला, “माझं याबाबतीत बऱ्याचदा रितेशसाेबत बोलणं होतं, बऱ्याचदा मला ताे मधात फाेन करून सांगताे की, मराठी चित्रपट करूया. मीदेखील उत्साहात त्याला हाेकार देताे. मात्र, पुढे काहीच हाेत नाही।” थाेडक्यात काय तर, विवेक ओबेरॉयने रितेश देशमुखबरोबर मराठी चित्रपट करायची इच्छा व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
माध्यमाल दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “मी कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायला तयार आहे. कारण, जर तुमचा चित्रपट चांगला असेल, तर तो सुपरहीट ठरतोच. रितेश देशमुखच्या ‘वेड’चंच उदाहरण घ्या, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेली कामगिरी काैतुकास्पद आहे.”
View this post on Instagram
विवेक ओबेराॅयच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘मस्ती’, ;ग्रॅंड मस्ती’, ‘साथिया’, ‘ग्रेट ग्रॅंड मस्ती’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. यासाेबतच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धारावी बँक’ या सीरिजमधील विवेकने साकारले्ल्या भूमिकेचं लोकांनी खूप कौतुक केलं आहे. यात विवेक ओबेराॅयव्यतिरिक्त सुनील शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत आहे.(bollywood actor vivek oberoi wanted to do full marathi feature film with marathi actor riteish deshmukh)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार
‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…