Monday, July 1, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांकडे आहेत लक्झरी बाइक्स; किंमती ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

बॉलिवूडच्या चित्रपटांची क्रेझ चाहत्यांमध्ये खूप आहे. कलाकार आपल्या चित्रपटांमधून करोडो रूपये कमावतात. अशामध्ये ते लक्झरी आयुष्य जगतात. त्यांच्याकडे आलिशान बंगले, महागड्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच काही कलाकार असेही आहेत ज्यांच्याकडे लक्झरी बाइक्स आहेत. पेट्रोलचे दर सध्याला गगनाला भिडले आहेत. असे असून देखील बाईकची आवड आणि वेड तरुणांच्या मनातून जात नाही. चला तर जाणून घेऊया, कोणत्या अभिनेत्याकडे कोणती महागड्या बाईक्स आहेत.

जॉन अब्राहम
बाईकचा विषय म्हटला की तिथे एका अभिनेत्याचे नाव हमखास येते, तो म्हणजे जॉन अब्राहम. जॉनकडे सुपरबाईकचे कलेक्शन आहे. त्यातली Suzuki GSX-1300R या गाडीची किंमत २६-३० लाखांच्या घरात आहे.

 

चित्रपट कारकिर्दीएवढाच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला अभिनेता संजय दत्तकडे हारले डविडसन फॅट बॉय ही सुपरबाईक असून याची किंमत जवळपास २१ लाख एवढी आहे.

सलमान खान
बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खान याच्याकडे देखील सुपर बाईकचे कलेक्शन आहे. त्यांची Suzuki Intruder M1800 RZ ची किंमत ही १५ लाख आहे. शिवाय त्याच्याकडे १३.५ लाखांची Suzuki Hayabusa देखील आहे. (bollywood actors and their expensive superbikes)

शाहीद कपूर
बॉलिवूडचा कबीर सिंग शाहीद कपूर याचे देखील बाईक प्रेम सर्वांना माहीत आहे. शाहिद कपूरकडे देखील हारले डविडसन फॅट बॉय ही २१ लाखांची बाईक आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा
बॉलिवूड मधिल हँडसम अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा सिद्धार्थ मल्होत्रा देखील या शर्यतीत मागे नाही. सिद्धार्थ २५ लाखांची हारले डविडसन फॅट बॉबचा मालक आहे.

आर माधवन

दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन याच्याकडे बीएमडब्ल्यू के १५०० जीटीएल बाइक आहे. ज्यांची किंमत २४ लाखांच्या आसपास आहे. माधवन अनेकदा आपल्या बाईकवरून रस्त्यावर फिरताना दिसत असतो

हे देखील वाचा